Pariksha Pe Charcha 2023 : ‘परीक्षा पे चर्चा’, पीएम मोदी आज साधणार विद्यार्थ्यांशी संवाद, 38 लाखांहून अधिक विद्यार्थ्यांचा सहभाग | पुढारी

Pariksha Pe Charcha 2023 : 'परीक्षा पे चर्चा', पीएम मोदी आज साधणार विद्यार्थ्यांशी संवाद, 38 लाखांहून अधिक विद्यार्थ्यांचा सहभाग

पुढारी ऑनलाइन डेस्क : Pariksha Pe Charcha 2023 : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज सकाळी 11 वाजता परीक्षा पे चर्चा या कार्यक्रमांतर्गत विद्यार्थ्यांशी संवाद साधणार आहे. दिल्लीच्या तालकटोरा स्टेडियममध्ये हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. कार्यक्रमात देशभरातील दोन हजार विद्यार्थी प्रत्यक्ष उपस्थित राहून सहभागी होतील. तर बाकी अनेक विद्यार्थी लाइव टेलिकास्टच्या माध्यमातून या कार्यक्रमात सहभागी होतील. पीपीसी 2023 (PPC 2023) स्पर्धेतील विजेतांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी थेट संवाद साधण्याची संधी मिळणार आहे.

Pariksha Pe Charcha 2023 : परीक्षा पे चर्चा हा कार्यक्रम 10 वी 12 वीच्या विद्यार्थ्यांच्या बोर्ड परीक्षेच्या आधी खास विद्यार्थ्यांचे मनोबल वाढविण्यासाठी आयोजित केला जातो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी 2018 मध्ये या कार्यक्रमाची सुरुवात केली होती. ज्यामध्ये पीएम मोदी देशातील विद्यार्थी, शिक्षक आणि पालक यांच्याशी चर्चा करतात.

या वर्षी 38 लाख पेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी या कार्यक्रमात भाग घेण्यासाठी रजिस्ट्रेशन केले आहे. गेल्या वर्षी पेक्षा ही संख्या दुपटीने अधिक आहे. या कार्यक्रमाचे ट्वीटर, फेसबुक आणि शिक्षण मंत्रालयाच्या यू ट्यूब चॅनल यासोबत प्रधानमंत्री कार्यालयाकडून केले जाईल. तसेच शिक्षण मंत्रालयाची अधिकृत वेबसाइट education.gov.in वर लाइव ब्रॉटकास्ट लिंक देण्यात येणार आहे.

Pariksha Pe Charcha 2023 : कार्यक्रमासाठी विद्यार्थ्यांनी विचारले 20 लाख प्रश्न

केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी एका पत्रकार परिषदेत सांगितले की कार्यक्रमात आतापर्यंत जवळपास 20 लाख प्रश्न आले आहेत. NCRT द्वारे या प्रश्नांना शॉर्टलिस्ट केले जाईल. यामध्ये कौटुंबिक दबाव, तणावाचे नियोजन, चुकीच्या साधनांचा गैरवापर थांबवणे, आरोग्य आणि फिटनेस कसा जपावा, करियर कसे निवडावे या विषयांवर प्रश्न असणार आहेत. परीक्षा पे चर्चा या कार्यक्रमासाठी 155 देशांनी रजिस्ट्रेशन केले आहे, अशी माहिती प्रधान यांनी दिली आहे.

हे ही वाचा :

Pakistan Power Cut : संपूर्ण पाकिस्तानने सोमवारची रात्र काढली अंधारात; देश उर्जा संकटात

Hindenburg Research : गौतम अदानींना ४५ हजार कोटींचा दणका देणारे कोण आहेत नॅथन ॲंडरसन

Back to top button