Raj Thackeray News : कोण, कोणत्या पक्षात हेच कळेना : राज ठाकरे | पुढारी

Raj Thackeray News : कोण, कोणत्या पक्षात हेच कळेना : राज ठाकरे

मुंबई : पुढारी वृत्तसेवा :  बाळासाहेब ठाकरे यांच्या तैलचित्राच्या अनावरणासाठी मी विधानभवनामध्ये गेलो होते. त्यावेळी मी खाली नजर टाकल्यावर मला कोण, कोणत्या पक्षात आहेत हेच कळेना, असा टोला मनसेप्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray News ) यांनी लगावला. तसेच राजकारणाच्या ठिकाणी गंमत चालू आहे. लोकांचे प्रश्न जशेच्या तसे आहेत. सुशोभीकरणाच्या नावाखाली शहरांमधील पोल्सला केवळ दिवे लावले जात आहेत. यामुळे संध्याकाळी मुंबई आहे का डान्सबार ? हेच कळत नाही, अशी मिश्कील टिपणी करत याला काय सुशोभीकरण म्हणायचे का? असा सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केला.

Raj Thackeray News : सरकार कोणाचेही येवो…

एका वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात राज ठाकरे बोलत होते. राज्यातील तसेच मुंबईमधील कित्येक रस्ते असे आहेत की तेथून अग्निशमन दलाचा बंबदेखील जाऊ शकत नाही, वाहने कशीही पार्क केली जातात. हा प्रश्न कसा सोडवायचा, असे सांगत राज ठाकरे म्हणाले, सुशोभीकरण कसले? शहरांमध्ये पोल्सला दिवे लावले आहेत. संध्याकाळी मुंबई आहे का डान्सबार हेच कळत नाही. याला काय सुशोभीकरण म्हणायचे का? आगोदरच्या साचलेल्या प्रश्नांची उत्तरे सापडेनात आणि आपण नवीन कुठली तरी उत्तरे शोधत बसलो आहोत. सरकार कोणाचेही येवो, किमान काही धोरणांमध्ये फेरबदल होणार नाही, ही गोष्ट झाली ‘, पाहिजे. दहा वर्षांपूर्वी ज्यांनी व्हिजन सांगितले त्याचे काय झाले? असा सवाल करत ठाकरे म्हणाले, राजकारण्यांकडून व्हिजन घेण्याऐवजी त्यांना व्हिजन देण्याची सध्या गरज आहे. महाराष्ट्राच्या राजकारणाचा बकालपणा झाला असून, जो चिखल झाला आहे, त्यामुळे राजकारण्यांकडून व्हिजन घेण्याऐवजी त्यांना व्हिजन देण्याची गरज आहे.

हेही वाचा 

Back to top button