शिपायाची मुलगी न्यायाधीश; पहिल्‍या प्रयत्‍नात दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर, प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी म्‍हणून झाली निवड | पुढारी

शिपायाची मुलगी न्यायाधीश; पहिल्‍या प्रयत्‍नात दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर, प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी म्‍हणून झाली निवड

सोलापूर : पुढारी वृत्तसेवा : महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर व प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी या परीक्षेत स्नेहा सुनिल पुळुजकर या उत्तीर्ण झाल्या आहेत. त्यांची न्यायाधीशपदी निवड झाली आहे. स्नेहा पहिल्‍याच उत्तीर्ण झाले आहेत.

स्नेहा यांचे वडील सुनिल पुळुजकर हे सोलापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेत शिपाई या पदावर तर आई उज्ज्वला या जिल्हा क्षयरोग केंद्रात कक्षसेविका या पदावर काम करत आहेत. सोलापूर येथील सेवासदन प्रशालेतून दहावी तर दयानंद महाविद्यालयातून बारावी विज्ञान शाखेतून त्‍यांनी शिक्षण पूर्ण केले. त्यांनी ऑर्कीड अभियांत्रिकी कॉलेजमधून पदवी संपादन केली. त्यानंतर त्यांनी दयानंद लॉ कॉलेज मधून कायद्याची पदवी पूर्ण केली.  सोलापूर विद्यापीठातून गोल्ड मेडल मिळवून त्यांनी एल. एल. एम. पूर्ण केले.

स्नेहा यांचे आई-वडील दोघेही शिपाई या पदावर नोकरी करत आहेत.  दरम्‍यान,  त्यांनी परिस्थिती अत्यंत हालाखीची आहे. या परिस्थितीमधून त्‍यांनी आपल्‍या मुलीला शिकवले आहे. तर स्नेहा या अ‍ॅड. ए. बी. अंदोरे यांच्याकडे ज्युनिअर म्हणून काम पाहत होत्या.

.हेही वाचा 

धुळे : सावळदे पुलावर अपघात ; ट्रक व बेपत्ता चालकाला शोधण्याचे काम युद्ध पातळीवर

मालेगाव : घंटागाडी कामगारांचे मनपा प्रवेशद्वारासमोर आंदोलन  

पालघर : ऐतिहासिक शिरगाव कोट किल्ल्यावर शेकडो वर्षांनी तोफगाडा विराजमान

 

Back to top button