रायगड : जिल्ह्यातील शेती व्यवसाय नामशेष होण्याच्या मार्गावर | पुढारी

रायगड : जिल्ह्यातील शेती व्यवसाय नामशेष होण्याच्या मार्गावर

महाड; पुढारी वृत्तसेवा :  मागील काही दशकापासून केवळ आपल्या देशातच नव्हे तर सर्वत्र औद्योगिकतेला मिळत असलेली चालना लक्षात घेता, देशातील मोकळी असलेल्या जमिनीचा कृषी क्षेत्रावर करिता होणारा वापर व सिंचनाचे घटलेले प्रमाण लक्षात घेता या क्षेत्राकडे शासन व संबंधित यंत्रणांचे दुर्लक्ष भविष्यकालीन विचार करता दुर्दैवी असल्याचे स्पष्टपणे दिसत असून भविष्यकाळाची गरज म्हणून शेतीला आता व्यवसाय म्हणून घोषित करण्याची मागणी या क्षेत्रातील जाणकारांसह ग्रामीण भागातील शेतकरी वर्गातून केली जात आहे. ज्या पद्धतीने सध्या यांत्रिकीकरण व औद्योगिकतेचे वारे व्यवसाय म्हणून वाढत आहेत हे लक्षात घेता शेती व्यवसाय हा १० वर्षात नामशेष होईल अशी भीती या क्षेत्रातील जाणकारांकडून व्यक्त होत आहे.

पहिले तालुक्यात दोनच जेसीबी होते, आता प्रत्येक गावात गल्लीत कितीतरी जेसीबी व पोकलेन आहेत. परिणामी ग्राहक कमी झाले, किंमती वाढल्या डिझेलचा दर एवढा वाढला कि नफा कमी झाला. परिणाम धंदा बंद पडला असल्याचे चित्र पहावयास मिळत असून पेट्रोल पंप २५ कि.मी. वर होता तो आता ५ कि.मी. वर आला असून भविष्यात एक कि.मी. राहील अशीच सध्याची वाटचाल आहे रसाचे दुकान प्रत्येक लिंबाच्या झाडाखाली आहे, कापड दुकान, मोबाईल दुकान, हार्डवेअर कुठलही सेल्सचं दुकान त्याच भविष्य हे अंधारात आहे याचे कारण शोधल्यास असे लक्षात येते की ऑनलाईन शॉपिंग कंपनी आज होलसेल व ग्राहकांना त्यांच्या घरापर्यंत सेवा देत आहे.
म्हणूनच आता गरज आहे ती शेतीकडे व्यवसाय दृष्टीने बघण्याची, जगाच्या पाठीवरील सर्वात जास्त व्याप्ती असलेली इंडस्ट्री म्हणुन बघण्याची, दृष्टी बदला दृष्टिकोन बदलेल. शेतकरी हा उत्तम व्यावसायिक आहे.

शेती हा खानदानी व्यवसाय आहे, पहिले शेती व्यवसाय हा वरिष्ठ, नोकरी हा कनिष्ठ मानला जायचा, आज ही शेती व्यवसाय वरिष्ठच आहे फक्त कष्ट नको म्हणून नोकरी वरिष्ठ वाटायला लागली, हेच कटु सत्य आहे. पण शेती हा व्यवसाय पहिल्या सारखा कष्टाचा नाही राहिला त्यात कमालीचा बदल झाला आहे. यांत्रीकीकरणामुळे अनेक काम सोपे झाले आहे. शेती हा व्यवसाय पूर्वी पासून सुरु आहे म्हणुन भारत देश हा सत्तर टक्के कृषी प्रधान आहे. शेती व्यवसाय हा पिढ्यान पिढ्या टिकणारा आहे. आज तुम्ही करताय उद्या तुमचे मुलं करतील तो न बंद होणारा व्यवसाय आहे, आज कोणताच शेतकरी जमीन विकायला तयार नाही, शेतकरी हा उत्तम, टिकाऊ व्यवसाय आहे, भविष्यात नोकरी कोणतीच राहणार नाही म्हणून शेतकऱ्याला महत्व येणार आहे, शेतकरी मुलाची किंमत येत्या पाच वर्षात आपल्याला कळेल त्या वेळेस आपल्याकडे पश्चाताप शिल्लक राहील. शेती ह्या व्यवसायात कोणाचा रुबाब ऐकायची गरज नाही, टार्गेट नाही. तेव्हा शासकीय स्तरा- वरील नव्हे तर जनमानसातील या शेतीकडे पाहण्याचा दृष्टिकोन आता व्यवसाय म्हणून स्वीकारण आवश्यक आहे.

शेती हा व्यवसाय कधी बंद होत नाही, नैसर्गिक आपत्ती आली तरी त्यातुन सावरण्याची ताकद त्या शेतकऱ्यात आहे शेती हा उत्तम व टिकाऊ व्यवसाय आहे. त्याला जगातील कोणतीच कंपनी टक्कर देऊ शकत नाही. मागील काही वर्षात महाराष्ट्रात प्रदेशात आलेल्या चक्रीवादळानंतर तसेच अनेक नैसर्गिक आपत्ती नंतरही शेतकरी वर्ग अर्थात आपला बळीराजा हा पुन्हा एकदा कंबर कसून | आपल्या सोने देणाऱ्या मातीमध्ये स्वतःला गुंतवून घेत आहे किंबहुना या क्षेत्रामध्ये तरी आत्ता पावितो त्याला स्पर्धेत निर्माण झालेले नाहीत.

Back to top button