Election : लोकसभा-विधानसभा निवडणूक मुख्यमंत्री शिंदे यांच्याच नेतृत्वाखाली; भाजपचा विचार | पुढारी

Election : लोकसभा-विधानसभा निवडणूक मुख्यमंत्री शिंदे यांच्याच नेतृत्वाखाली; भाजपचा विचार

मुंबई, पुढारी वृत्तसेवा, Election : लोकसभा आणि विधानसभा निवडणूक मुख्यमंत्री शिंदे यांच्याच नेतृत्वाखाली घेण्याबाबत भाजप विचार करत आहे. युतीमध्ये शिवसेनेला दिलेले 18 लोकसभा मतदारसंघ आणि 50 विधानसभेच्या जागा शिंदे गटाला दिल्या जाणार असल्याचे समजते.

शिंदे यांच्यासोबत सुरुवातीला 23 आमदार सुरतला गेले होते. त्यामधून दोन आमदार ‘माघारी’ फिरल्यामुळे 21 आमदार गुवाहाटीला गेले होते; तर दिल्लीतून चक्रे फिरल्यामुळे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रयत्नांमुळे 31 आमदारांनी गुवाहाटी गाठली होती. तरीसुद्धा हे आमदार शिंदे गटाचे मोजले जात असल्यामुळे विधानसभेच्या 50 जागा सोडण्याबाबत भाजप राजी असल्याचे बोलले जात आहे.

शिवसेना-भाजप युतीप्रमाणे आम्ही 144 जागा लढवू शकत नाही, अशी कबुली शिंदे गटातील एका ज्येष्ठ आमदाराने दिली. मुख्यमंत्री शिंदे यांनी भाजपकडे मागणी केल्यास 50 पेक्षा अधिक जागा मिळू शकतात, असा दावाही त्यांनी केला.

हे ही वाचा :

One Nation One Election : लोकसभेसोबतच महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीची तयारी

भारतीय नौदलातील 8 निवृत्त अधिकारी 129 दिवसांपासून कैद

Back to top button