महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाची आज निवडणूक आयोगासमोर सुनावणी | पुढारी

महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाची आज निवडणूक आयोगासमोर सुनावणी

मुंबई; पुढारी वृत्तसेवा :  शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह कोणाचे या ठाकरे आणि शिंदे गटांच्या दाव्यावर निवडणूक आयोगासमोर मंगळवारी सुनावणी होणार आहे.

या आधीच्या सुनावणीदरम्यान, दोन्ही बाजूंनी एकदा युक्तिवाद झाले होते. तसेच उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना पक्षप्रमुखपदाचा पाच वर्षांचा कार्यकाळ 23 जानेवारी 2023 रोजी संपत आहे. हा कायदेशीर पेच संपेपर्यंत त्यांना मुदतवाढ द्या, अशी मागणी ठाकरे गटाने निवडणूक आयोगाकडे केली आहे. सर्वोच्च न्यायालयात महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षावरील सुनावणी जरी फेब्रुवारी महिन्यात होणार असली तरी शिवसेना कुणाची, धनुष्यबाण चिन्ह कुणाचे याचा निर्णय मात्र, त्या आधीच होण्याची शक्यता आहे.

Back to top button