Nashik MLC Election : पाकळ्या मिटून घेण्याचं हे ‘नवं ऑपरेशन कमळ’ म्हणावं का? – दिलीप वळसे पाटील यांनी भाजपला डिवचले | पुढारी

Nashik MLC Election : पाकळ्या मिटून घेण्याचं हे 'नवं ऑपरेशन कमळ' म्हणावं का? - दिलीप वळसे पाटील यांनी भाजपला डिवचले

मुंबई: पाकळ्या मिटून घेण्याचं हे नवं ऑपरेशन कमळ म्हणावं का? (Nashik MLC Election) असा सवाल करत राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी ट्वीट करत भाजपला चांगलेच डिवचले आहे. भाजपने नाशिक पदवीधर मतदारसंघातून अधिकृत उमेदवार उभा केला नाही, तर दुसरीकडे काँग्रेसचे उमेदवार डॉ. सुधीर तांबे यांनी अर्ज दाखल न करता त्यांचा मुलगा सत्यजित तांबे यांच्यासाठी माघार घेतली. त्यामुळे या निवडणुकीत नवीन ट्वीस्ट आल्याचे पाहायला मिळाले.

दरम्यान नाशिक पदवीधर मतदारसंघात भाजपने अखेरच्या क्षणापर्यंत एबी फॉर्म कुणालाही दिला नाही किंवा अधिकृत उमेदवारही घोषित केला नाही, असे ट्वीटमध्ये दिलीप वळसे पाटील यांनी म्हटले आहे. आज सकाळीच हे ट्वीट करत दिलीप वळसे पाटील यांनी भाजपवर थेट हल्लाबोल केला आहे.

विधान परिषदेच्या नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत (Nashik MLC Election) गुरुवारी (दि. १२) अर्ज दाखल करण्याच्या अखरेच्या दिवशी ट्विस्ट पाहायला मिळाला. काँग्रेसचे अधिकृत उमेदवार डॉ. सुधीर तांबे यांनी पुत्र सत्यजित यांच्या प्रेमापोटी अखेरच्या क्षणी निवडणुकीतून माघार घेतली. सत्यजित तांबे (Satyajeet Tambe) यांनी अपक्ष अर्ज दाखल केल्याने काँग्रेससाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. भाजपने अखेरपर्यंत उमेदवार न दिल्याने तांबेंच्या विजयाचा मार्ग सुकर झाला आहे. त्यामुळे या पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत आता नवीन ट्विस्ट पाहायला मिळणार असल्याचे दृश्य दिसत आहे.

हेही वाचा:

Back to top button