परिवहनमंत्री अनिल परब यांना पुन्हा ईडीचे समन्स; सोमय्यांनी केले ‘हे’ ट्विट - पुढारी

परिवहनमंत्री अनिल परब यांना पुन्हा ईडीचे समन्स; सोमय्यांनी केले ‘हे’ ट्विट

मुबंई, पुढारी ऑनलाईन: परिवहनमंत्री अनिल परब यांना ईडीने दुसऱ्यांदा समन्स पाठविले असून २८ सप्टेंबर रोजी चौकशीसाडी हजर राहणार असल्याचे ट्विट किरीट सोमय्या यांनी केले आहे.

ईडीने गेल्या महिन्यात मंत्री अनिल परब यांना चौकशीला हजर रहाण्यासाठी नोटीस बजावली होती. त्यानंतर ईडीने ३० ऑगस्ट रोजी तीन ठिकाणी छापेमारी केली होती.

#यूपीएससी, एमपीएससी म्हणजे आयुष्य नव्हे; प्लॅन ‘बी’ चा विचार करा

गारगोटीचा झेंडा यूपीएससीत; आनंद पाटील देशात ३२५ वा

यात परबांचे निकटवर्तीय मानले जाणारे प्रादेशिक परिवहन अधिकारी (आरटीओ) बजरंग खरमाटे यांच्या नागपूर येथील घरावर छापेमारी करुन काही कागदपत्रे आणि महत्त्वाचे दस्तऐवज ताब्यात घेतले होते.

मंत्री असल्याने काही कार्यक्रम आधीच ठरलेले असल्याचे सांगत अनिल परब यांनी चौकशीला हजर न रहाता ईडीकडे वेळ मागितला होता.

त्यानंतर ईडीने खरमाटे यांना चौकशीला बोलावून त्यांची ८ तास कसून चौकशी केली होती. तसेच ईडीने वाहन निरीक्षक गजेंद्र पाटील यांचीही चौकशी करुन त्यांचा जबाब नोंदविला आहे.

बजरंग खरमाटे आणि गजेंद्र पाटील यांच्या चौकशीने परिवहनमंत्री अनिल परब यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता वर्तविण्यात येत असतानाच ईडीने शुक्रवारी अनिल परब यांना चौकशीला हजर रहाण्यासाठी समन्स बजावले.

परिवहनमंत्री अनिल परब यांना पुन्हा समन्स आल्याने त्यामुळे राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे.

पंतप्रधानांचे ‘इंडिया वन’ विमान आहे अत्यंत खास या आहेत सुविधा

नरीमन पॉईंट जवळ येणार दिल्ली; फ्री वेचे स्ट्रक्चरल ऑडिट होणार

खोचक ट्विट

गेल्या काही दिवसांपासून अनिल देशमुख, अनिल परब, ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांच्यासह महाविकास आघाडीतल्या अनेक नेत्यांवर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप करणाऱ्या किरीट सोमय्या यांनी केले आहेत.

सोमय्या यांनी ट्विट करत परब यांच्यावर खोचक टिप्पणी केली आहे. आशा आहे आता तरी अनिल परब २८ सप्टेंबरला ईडीसमोर उपस्थित होतील, असं ट्विट त्यांनी केले आहे.

भूकंपाच्या धक्क्यांनी हादरतोय लाल ग्रह, नासाचे संशोधन

औरंगाबाद : अतिवृष्टीने पिकांचे नुकसान; हताश शेतकऱ्याने स्वत:च्या शेतात संपवले जीवन

मुश्रीफ यांच्यावर आरोप

काही दिवसांपूर्वी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या सरसेनापती संताजी घोरपडे कारखाना २२७ आणि गडहिंग्लजच्या अप्पासाहेब नलवडे सहकारी साखर कारखान्यातील १०० कोटींच्या घोटाळ्याचा आरोप किरीट सोमय्या यांनी केला होता.

यासंदर्भातील कागदपत्रे त्यांनी ईडीला दिली होती, असेही ते म्हणाले. यासंदर्भात ईडीने अद्याप काहीच कार्यवाही केलेली नाही. तरीही त्यावरून संघर्ष सुरू आहे. सोमय्या हे कागल पोलिस ठाण्यात तक्रार देण्यासाठी येत असताना त्यांना मुंबईत रेल्वेत चढताना रोखले. तसेच त्यांना कोल्हापुरात येऊ दिले नाही. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसवर टीका होत होती. शुक्रवार मुश्रीफ यांनी पत्रकार परिषद घेऊन सोमय्या यांना कुणीही विरोध करू नका, असे आवाहन केले आहे.

हेही वाचा : 

Back to top button