रायगड : वीज मंडळाच्या खासगीकरणाविरोधात कर्मचारी, अधिकाऱ्यांचा संप | पुढारी

रायगड : वीज मंडळाच्या खासगीकरणाविरोधात कर्मचारी, अधिकाऱ्यांचा संप

महाड; पुढारी वृत्तसेवा : महाराष्ट्र शासनाकडे देशातील प्रसिद्ध उद्योगपती अदानी यांनी मुंबईमधील भांडुप ते पनवेल परिसरातील विद्युत पुरवठा आपल्या कंपनीस देण्याबाबत मागणीला वीज मंडळ कर्मचारी, अधिकाऱ्यांनी विरोध दर्शवला आहे. वीज वितरण खासगीकरण विरोधात आज संपूर्ण महाराष्ट्रात सुरू झालेल्या तीन दिवसीय संपाची महाडमध्ये सुरुवात झाली. “अदानी गो बॅक” ” वीज मंडळ कर्मचारी अधिकारी संघटनेचा विजय असो”” अशा घोषणा यावेळी देण्यात आल्‍या.

महाड-पोलादपूर मधील सर्व फिडर व सर्व सेक्शन मध्ये विद्युत पुरवठा सुरळीत सुरू आहे, अशी माहिती वीज मंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी केलेल्या संपर्कात प्राप्त झाली.

आज (बुधवार) सकाळी महाडमधील छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये असलेल्या विद्युत वितरण विभागाच्या कार्यालयात तालुक्यातील सर्व कर्मचारी व पदाधिकाऱ्यांनी एकत्रित येऊन शासनाच्या वीज मंडळाच्या खाजगीकरणासंदर्भातील भूमिकेविरोधात तीव्र घोषणाबाजी केली. यावेळी नागरिकांनी देखील शासनाच्या वीज मंडळ खासगीकरणाला विरोध असल्याचे स्पष्ट करून वीज मंडळ कर्मचाऱ्यांना संपूर्ण पाठिंबा जाहीर केला.

दरम्यान, या तीन दिवसीय इशारा संपानंतर शासनाने खाजगीकरणा विरोधात निर्णय न घेतल्यास, चालू महिन्यात 17 जानेवारीनंतर कधीही बेमुदत संपाचा इशारा संघटनेच्या वतीने देण्यात येईल, अशी माहिती संघटनेच्या महाड मधील पदाधिकाऱ्यांकडून देण्यात आली.

हेही वाचा : 

Back to top button