Corona : कोरोनावरील पॅक्सलोव्हिड औषधाची पहिली जेनेरिक आवृत्ती काढण्याचा मान भारताला! WHO चा हिरवा कंदील | पुढारी

Corona : कोरोनावरील पॅक्सलोव्हिड औषधाची पहिली जेनेरिक आवृत्ती काढण्याचा मान भारताला! WHO चा हिरवा कंदील

कोल्हापूर, राजेंद्र जोशी : Corona : कोरोनावरील गंभीर स्थितीमध्ये गुणकारी ठरणार्‍या ‘पॅक्सलोव्हिड’ या विषाणूविरोधी औषधाच्या जेनेरिक रूपाची निर्मिती करणार्‍या हैदराबादस्थित ‘हेट्रो लाईफ सायन्सेस’ या कंपनीला जागतिक आरोग्य संघटनेने हिरवा कंदील दाखविला आहे.

Corona : जागतिक बाजारात ‘निरमाकॉम’ या ब्रँडखाली औषधाची जेनेरिक आवृत्ती काढण्याचा पहिला मान ‘हेट्रो लाईफ सायन्सेस’ या भारतीय कंपनीला मिळाला आहे. शिवाय, हे औषधही आता जागतिक बाजारातील किमतीच्या तुलनेत अवघ्या 10 टक्के किमतीला भारतीयांना उपलब्ध होणार आहे. अमेरिकास्थित ‘फायझर’ या बहुराष्ट्रीय कंपनीने ‘पॅक्सलोव्हिड’ हे विषाणूविरोधी औषध सर्वप्रथम बाजारात आणले होते. त्याच्या स्वामित्वाचे हक्कही ‘फायझर’कडे असल्याने त्याचे जेनेरिक रूप भारतीय बाजारात उपलब्ध नव्हते. ‘पॅक्सलोव्हिड’ हे ‘निरमाट्रेलवीर’ आणि ‘रिटोनावीर’या दोन मूलद्रव्यांचे संयुग आहे. या औषधाच्या 30 गोळ्यांचा कोर्स रुग्णाला करावा लागतो. सध्या विदेशी बाजारामध्ये या एका कोर्सची किंमत 40 हजार रुपये (500 डॉलर्स) इतकी आहे.

Corona : या औषधाच्या किमतीमुळे सर्वसामान्य ग्राहकाला त्याचा लाभ होत नव्हता. आता ‘हेट्रो लाईफ सायन्सेस’ने ‘निरमाकॉम’ या ब्रँडखाली हे औषध बाजारात आणण्याची तयारी सुरू केली आहे. जागतिक आरोग्य संघटनेने त्याला मान्यता दिल्यामुळे या औषधाची निर्मिती सध्या जोमाने सुरू आहे.

हे ही वाचा :

Corona Booster Dose : कोरोनाला रोखण्यासाठी दुसरा ‘बूस्टर डोस’ द्या : ‘आयएमए’ची आरोग्य मंत्रालयाला शिफारस

तुनिषा शर्मा हिला उर्दू शिकवले, हिजाब घालायला लावले

Back to top button