राहुल गांधी नियम पाळत नाहीत, ११३ वेळा तोडला प्रोटोकॉल : सीआरपीएफ | पुढारी

राहुल गांधी नियम पाळत नाहीत, ११३ वेळा तोडला प्रोटोकॉल : सीआरपीएफ

पुढारी वृत्तसेवा; नवी दिल्ली : काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या सुरक्षेबाबत सीआरपीएफने (केंद्रीय राखीव पोलीस दल) गुरुवारी (दि.२९) मोठे विधान केले आहे. २०२० पासून राहुल गांधींनी अनेक वेळा नेमून दिलेल्या सुरक्षा निर्देशांचे उल्लंघन केल्याचे सीअरपीएफ कडून सांगण्यात आले आहे. सीआरपीएफने सांगितले की, राहुल गांधींनी ११३ वेळा सुरक्षेचे नियम मोडले आहेत. भारत जोडो यात्रेदरम्यान राहुल गांधी यांची सुरक्षा वाढवण्याची मागणी काँग्रेसने केंद्र सरकारकडे केली होती. पक्षाचे सरचिटणीस केसी वेणुगोपाल यांनी याबाबत गृहमंत्री अमित शहा यांना पत्र लिहिले आहे. दिल्लीत यात्रे दरम्यान राहुल गांधींच्या सुरक्षेत अनेक त्रुटी असल्याचं त्यांनी म्हटलं होतं. या प्रकरणी इंटेलिजन्स ब्युरोने (आयबी) यात्रेत सहभागी असलेल्या लोकांची चौकशी केली आहे.

Bharat Jodo Yatra : भारत जोडो यात्रा बंद करा : केंद्रीय आरोग्यमंत्र्यांचे राहुल गांधींना पत्र

दरम्यान, सीआरपीएफने म्हटले आहे की काँग्रेसची भारत जोडो यात्रा दिल्लीत दाखल होताच सीआरपीएफने मार्गदर्शक तत्त्वांनुसार दिल्ली पोलिसांशी संपर्क साधून आवश्यक ती सर्व व्यवस्था केली होती. यावेळी उत्तर देताना सीआरपीएफकडून सांगण्यात आले की, २०२० पासून राहुल गांधींनी ११३ वेळ सुरक्षा निर्देशांचे उल्लंघन केल्याचे निदर्शनास आले असून त्यांना योग्य ती माहिती देण्यात आली आहे. सीआरपीएफच्या म्हणण्यानुसार, जेव्हा सुरक्षा देण्यात आलेली व्यक्ती पूर्ण सुरक्षा मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करते तेव्हा सुरक्षा व्यवस्था चांगल्याप्रकारे काम करू शकते.

हे वचलंत का?

 

Back to top button