मेस्सी 'अशी' कामगिरी करणारा ठरला जगातील पहिला खेळाडू | पुढारी

मेस्सी 'अशी' कामगिरी करणारा ठरला जगातील पहिला खेळाडू

पुढारी ऑनलाईन डेस्क : फुटबाल जगातील सगळे पुरस्कार मिळाले; परंतु त्याच्या खजिन्यात वर्ल्डकप नव्हता. लियोनल मेस्सी ज्या स्वप्नाच्या शोधात इतकी वर्षे अथक परिश्रम करत होता ते अखेर पूर्ण झाले. त्याबरोबरच ग्रुप स्टेज, राऊंड 16, उपांत्यपूर्व फेरी, उपांत्य फेरी अन् फायनल एकाच स्पर्धेत या सर्व टप्प्यांत गोल करणारा मेस्सी जगातील पहिला खेळाडू ठरला.

मेस्सीने वर्ल्डकप स्पर्धेत 12 गोल केले आहेत आणि 8 गोल सहाय्य आहे. 1966 पासूनच्या वर्ल्डकप इतिहासातील ही सर्वोत्तम कामगिरी आहे. मेस्सीने अंतिम फेरीत गोल करताच तो विश्वचषकाच्या साखळी, राऊंड ऑफ 16, क्वार्टर फायनल, सेमीफायनल आणि फायनलमध्ये गोल करणारा तो विश्वचषक इतिहासातील पहिला खेळाडू बनला. मेस्सीने फायनलमध्ये गोलसाठी असिस्ट करत विश्वचषकाच्या इतिहासात सर्वाधिक 9 असिस्ट करणारा खेळाडू बनला आहे. त्याने डिएगो मॅराडोनाला (8) मागे टाकले.

2014 नंतर 2022 च्या वर्ल्डकपमध्ये दुसरा ‘गोल्डन बॉल’ जिंकणारा मेस्सी पहिला खेळाडू मेस्सीचा फिफा वर्ल्डकपमधील 17 वा विजय, जर्मनीच्या मिरोस्लाव क्लोसेची बरोबरी मेस्सी हा विश्वचषकाची फायनल खेळणारा जगातील दुसरा वयस्कर खेळाडू बनला आहे. रविवारी त्याचे वय 35 वर्षे 117 दिवस होते. यापूर्वी स्विडनचा निल्स लिएढोम हा 35 वर्षे 264 दिवसांचा असताना 1958 ची फायनल खेळला होता. ग्रुप स्टेज, राऊंड 16, उपांत्यपूर्व फेरी, उपांत्य फेरी अन् फायनल एकाच स्पर्धेत या सर्व टप्प्यांत गोल करणारा मेस्सी जगातील पहिला खेळाडू ठरला.

Back to top button