मोठी बातमी: चंद्रकांत पाटलांच्या चेहऱ्यावर शाई फेकणाऱ्या मनोज गरबडेसह तिघांना जामीन मंजूर | पुढारी

मोठी बातमी: चंद्रकांत पाटलांच्या चेहऱ्यावर शाई फेकणाऱ्या मनोज गरबडेसह तिघांना जामीन मंजूर

पुढारी ऑनलाईन डेस्क: पुण्याचे पालकमंत्री आणि राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर शाईफेक करणाऱ्या मनोज गरबडे याच्यासह तिघांना जामीन मंजूर करण्यात आला आहे. पाटील हे पिंपरी चिंचवडमधील मोरया गोसावी संजीवन समाधी महोत्सवाच्या कार्यक्रमासाठी आले असता त्यांच्या चेहऱ्यावर शाई फेकली होती. या नंतर पोलिसांनी शाई फेक करणाऱ्यांना ताब्यात घेतलं होतं.

१० डिसेंबर रोजी पालक मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर मनोज गरबडे यांनी शाईफेक केली होती. या प्रकरणी मनोज गरबडेसह तिघांना पोलिसांनी अटक केली होती. या तिघांवर पोलिसांनी 307 कलमासह इतर कलमं लावली होती. विरोधकांनी भाजपावर जोरदार टीका केल्यानंतर पिंपरी-चिंचवड पोलिसांनी कलम 307 (खुनाचा प्रयत्न) हे मंगळावारी वगळले होते. हे कलम राजकीय दाबावापोटी लावण्यात आल्याचे आरोपीचे वकील सचिन भोसले यांनी म्हटलं होतं.

मनोज गरबडे हा समता सैनिक दलाचा कार्यकर्ता आहे. दरम्यान गरबडे याच्यासोबत विजय धर्मा ओव्हाळ आण धनंजय ईचगज या दोन कार्यकर्त्यांना देखील अटक करण्यात आलं होतं. या तिघांनाही आज बुधवारी जामिनावर सोडण्यात आलं आहे.

पिंपरी चिंचवडमध्ये एका कार्यक्रमासाठी आलेल्या पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या तोंडावर मनोज गरबडेनं शाई फेकली आणि तिथं घोषणाबाजी देखील केली होती. या प्रकारानंतर पोलिसांनी लगेच त्याला ताब्यात घेतलं होतं.पाटील हे मंत्री पाटील हे चिंचवडमधील मोरया गोसावी संजीवन समाधी महोत्सवाचा शुभारंभ करायला आले होते. या कार्यक्रमस्थळी पोहचण्यापूर्वी मनोज गरबडेनं पाटलांच्या चेहऱ्यावर शाई फेकली.

Back to top button