Apple : iPhone 12 आणि  iPhone 13 मध्ये नेमका फरक काय? - पुढारी

Apple : iPhone 12 आणि  iPhone 13 मध्ये नेमका फरक काय?

पुढारी ऑनलाईन डेस्क अ‍ॅपल आयफोन (Apple iPhone) मोबाईलचा प्रत्येक जण चाहता असतो. अ‍ॅपल आयफोनची नवी सीरिज बाजारात कधी एकदा येते आणि आपण सर्वात पहिल्यांदा कधी एकदा खरेदी करतो, याची उत्सुकता प्रत्येकाला असते. तर, अ‍ॅपलने नुकतीच Apple iPhone 13 ही सीरिज बाजारात आणलेली आहे. या सीरिजमध्ये iPhone 13, iPhone 13 mini, iPhone 13 Pro, iPhone 13 Pro max, असे आयफोनचे प्रकार लाॅंच केलेले आहेत. तर जुना Apple iPhone 12 आणि नुकताच लाॅंच झालेले Apple iPhone 13 यांच्यामध्ये फरक काय आहे, याची उत्सुकता सर्वच आयफोन चाहत्यांना लागलेली आहे. चला तर पाहू या… दोन्ही आयफोनमधील नेमका फरक काय आहे.

कॅमेरा (Camera) : Apple iPhone 12 आणि Apple iPhone 13 या दोन्हींमध्ये डुअल रिअर कॅमेरे आहेत. पण, यामध्ये फरक असा  आहे की, पूर्वीच्या Apple iPhone 12 मध्ये ज्या जागेवर कॅमेरे होते, त्यांच्या जागा आता Apple iPhone 13 बदलण्यात आल्या आहेत. असं असलं तरी, कॅमेराच्या मेगापिक्सलमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. जुना आयफोन हा स्मार्ट एचआरडी – 3 होता. पण, Apple iPhone 13 हा स्मार्ट एचआरडी – 4 सोबत लाॅंच करण्यात आला आहे. इतकंच नाही, तर दोन्हीही आयफोन हे नाईट मोड, डीप फ्यूजन, ब्रस्ट मोड आणि फोटो जिओटॅगिंग, यांसारखे फिचर्स लेंस आहेत.

बॅटरी  (Battery) : मोबाईल खरेदी करणारा पहिल्यांदा बॅटरी लाईफबद्दल चौकशी करतो. कारण, मोबाईल वापरकर्ता बॅटरी लाईफवर मोबाईल खरेदी करायचा की नाही, हे ठरवतो. तर, आता अ‍ॅपल कंपनीचा विचार केला, ही कंपनी त्यांच्या आयफोनची बॅटरी सर्वात बेस्ट आहे, असा दावा करते. पण, आयफोनच्या बॅटरीची एमएएच पाॅवर कधीच सांगत नाही. Apple iPhone 12 चा विचार केला तर, हा फोन एकदा चार्च केला की, 17 तास व्हिडीओ आणि 65 तास ऑडिओ वापरकर्ता पाहू किंवा ऐकू शकत होता. याच्या तुलनेत आता आलेला iPhone 13 यामध्ये सलग 19 तास व्हिडीओ आणि 75 तास ऑडिओ पाहू किंवा ऐकू शकतो.  iPhone 13 बॅटरीचं वैशिष्ट असं की, 30 मिनिटांत 50 टक्के चार्ज करण्यात हा मोबाईल सक्षम आहे.

डिस्प्ले (Display) : Apple iPhone 13 च्या डिस्प्लेचा विचार केला तर, Apple iPhone 12 सारखाच डिस्प्ले आहे. त्यामध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. दोन्ही आयफोन्सची 6.1 इंचाची ओएलईडी डिस्प्ले आहे. दोघांच्या पिक्सल रेज्युलेशन विचारात घेता  2532 x 1170 पिक्सल रेज्युलेशन आहेत. दोन्ही ओयफानचे डिस्प्ले हे राऊंड काॅर्नर आहेत. पण, दोन्ही आयफोनच्या ब्राईटनेस (Brightness) बद्दल बोलायचं झालं तर Apple iPhone 12 मध्ये 625 Nits Max Brightness होता, तर आता Apple iPhone 13 मध्ये तोच ब्राईटनेस म्हणजे 800 Nits Max Brightness पर्यंत देण्यात आला आहे.

स्टोरेज (Storage) : iPhone 13 वेगवेगळे स्टोरेज दिलेल्या आहेत. त्यानुसार किमती या आयफोनच्या बदलतात. पण, अ‍ॅपलने इथं मोठा बदल केलेला आहे तो म्हणजे पहिल्यांदाच iPhone 13 मध्ये 1 टीबी स्टोरेज देऊन चाहत्यांना आश्चर्यचकीत केलेले आहे. iPhone 12 मध्ये 64 GB, 128 GB, 256 GB इतकं स्टोरेज देण्यात आलं होतं. तर Apple iPhone 13 मध्ये  128 GB, 256 GB, 512 GB, 1 TB, इतकं स्टोरेज दिलेलं आहे. आणि तसंही पाहिलं तर आयफोनला माईक्रो एसडी कार्ड नसतंच.

किंमत (Price) : iPhone 13 च्या स्टोरेजवरून या फोनच्या किमती बदलतात. 128 GB चा आयफोन घेतला तर 79,900 रुपये आहे. 256 GB चा आयफोन घेतला तर 89, 900 रुपये आहे. 512 GB चा आयफोन घेतला तर 1 लाख 9 हजार 900 इतकी किंमच आहे आणि 1 TB चा आयफोन घेतला तर 1 लाख 69 हजार रुपये इतकी iPhone 13 ची किंमत आहे.

एंकदरीत आयफोनच्या चाहत्यांना iPhone 12 आणि iPhone 13 मध्ये तुलनात्मक फरक सांगायचा झाला तर ब्राईटनेस, बॅटरी लाईफ, स्टोरेज या प्रकारामध्ये iPhone 13 हा फोन iPhone 12 च्या तुलनेत सरस ठरतो आहे.

पहा व्हिडीओ : आरोग्याचा मूलमंत्र म्हणजेच नियमित योगासने

Back to top button