पैठण : टेबलाखालून पैसे घेणे पडले महागात ; दस्त नक्कल देण्यासाठी लाच घेणाऱ्यावर कारवाई | पुढारी

पैठण : टेबलाखालून पैसे घेणे पडले महागात ; दस्त नक्कल देण्यासाठी लाच घेणाऱ्यावर कारवाई

पैठण पुढारी वृत्तसेवा : पैठण येथील दुय्यम निबंधक कार्यालयातील दस्त नक्कल देण्यासाठी दलालाने २ हजार ३७५ रुपयांची लाच घेतली. लाचलुचपत प्रतिबंधक अधिकाऱ्याची कारवाई झाल्याचा संशय येताच लाच घेणाऱ्या दलालाने पावडर लावलेले पैसे फिर्यादी यांच्या जवळ ठेवून कार्यालयाच्या पाठीमागील दरवाजातून फरार झाला.

याबद्दलची अधिक माहिती अशी की अमोल शेषराव जाधव रा.गिरनेरा तांडा ता. औरंगाबाद हे पैठण तालुक्यातील शेतजमीन दस्त नोंदणीसाठी दुय्यम निबंधक कार्यालयात आले होते. दि.८ डिसेंबर रोजी त्यांनी खाजगी दलाल इम्रान रशीद सिद्दीकी रा. जोहरी वार्ड पैठण या व्यक्तीकडे मालमत्ता दस्त नक्कल देण्यासाठी शासकीय फी २२५ रुपये असताना प्रत्येकी दस्त नक्कल ३७५ प्रमाणे १ हजार ८७५ रुपये देण्याची मागणी केली. व नक्कल देण्याच्या मोबदला ५०० रुपये असे एकूण २ हजार ३७५ रुपये लाच घेतली.

याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक अधिकाऱ्यांनी कारवाई केल्याचा संशय आल्यामुळे तो पावत्या आणून देण्याचा निमित्त करून कार्यालयाच्या मागच्या दरवाजाने पळून गेला. त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून पुढील तपास औरंगाबाद ला.प्र.वि निरीक्षक अनिता ईटूबोने यांच्याकडे देण्यात आला आहे.

हेही वाचा

Back to top button