अमृतांजन पुलाजवळ अपघात; ब्रेक फेल झाल्याने ड्रायव्हर विना 1 किमी धावला ट्रक  | पुढारी

अमृतांजन पुलाजवळ अपघात; ब्रेक फेल झाल्याने ड्रायव्हर विना 1 किमी धावला ट्रक 

पुणे; पुढारी वृत्तसेवा : पुणे – मुंबई महामार्गावर वेगळाच अपघात घडला आहे. यावेळी एक ट्रक चक्क ड्रायव्हर विना सुमारे 1 किमी पर्यंत धावला आहे. सुदैवाने या अपघातात कोणीही जखमी झालेले नाही. मुंबईहून पुण्याच्या दिशेने येणाऱ्या एका ट्रकचा ब्रेक खंडाळा घाटात अमृतांजन पुलाजवळ फेल झाला. त्यावेळी चालकाने ट्रकमधून उडी मारली. त्यामुळे हा ट्रक चालकाविना तब्बल एक किलोमीटर पर्यंत सुसाट धावत कठड्यांना धडकला.

मात्र सकाळच्या सुमारास वाहतूक कमी असल्याने सुदैवाने यात कोणीही जखमी झाले नाही. अथवा अन्य वाहनांचे नुकसानही झाले नाही. या ट्रकने रस्त्यालगत असलेले कठडे आणि महामार्ग प्राधिकरणाच्या कर्मचाऱ्यांनी ठेवलेले बॅलर उडवले. यासंदर्भातील व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Back to top button