Thackeray family: ठाकरे कुटुंबीयांच्या बेहिशेबी मालमत्तेची चौकशी सुरू; राज्य सरकारची माहिती; इतकी आहे संपत्ती | पुढारी

Thackeray family: ठाकरे कुटुंबीयांच्या बेहिशेबी मालमत्तेची चौकशी सुरू; राज्य सरकारची माहिती; इतकी आहे संपत्ती

मुंबई; पुढारी वृत्तसेवा: राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि त्यांच्या कुटुंबीयांविरोधात बेहिशेबी मालमत्ता जमवल्याचा आरोप करत ईडी, सीबीआय चौकशीची मागणी करणाऱ्या याचिकेवर उच्च न्यायालयाने निर्णय राखून ठेवला आहे. त्यानंतर राज्य सरकारने या प्रकरणी मुंबई पोलिसांच्या आर्थीक गुन्हे अन्वेषण विभागामार्फत प्राथमिक चौकशी सुरू असल्याची माहिती न्यायालयात दिली. यामुळे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि कुटुंबीयांच्या अडचणी वाढल्या आहेत.

दादरमधील रहिवासी गौरी भिडे आणि त्यांचे वडील अभय भिडे यांनी ही याचिका दाखल केली आहे. ठाकरे कुटुबीयांचे उत्पन्न आणि संपत्तीवर बोट ठेवत संपत्तीचा ताळमेळ लागत नसल्याचा आरोप करून याप्रकरणाची सीबीआय आणि ईडीमार्फत चौकशी करण्याची मागणी याचिकेतून केली आहे.

काय आहे याचिका

उद्धव ठाकरे यांची संपत्ती ही भ्रष्टाचार आणि गैरमार्गाने जमा केलेली बेहिशेबी मालमत्ता असल्याचा आरोप याचिकेत करण्यात आला आहे. या प्रकरणी गौरी भिडे यांनी ११ जुलै २०२२ रोजी मुंबई पोलिस आयुक्तांकडे पत्र लिहून तक्रारही केली आहे. मात्र आजअखेर त्यावर कोणतीच कारवाई झालेली नाही. ठाकरेंच्या भ्रष्टाचार आणि मनी लाँडरिंगचे पुरावे असूनही कारवाई होत नाही, असा आरोप करत या याचिकेत केंद्रीय गृह मंत्रालय, केंद्रीय अर्थ मंत्रालय, सीबीआय, मुंबई पोलिस आयुक्त, उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, रश्मी ठाकरे आणि तेजस ठाकरे या सर्वांना प्रतिवादी करण्यात आले आहे.

या याचिकेवर न्यायमूर्ती धीरज ठाकूर आणि न्यायमूर्ती वाल्मिकी मेनेझिस यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. यावेळी ठाकरे कुटुंबीयांच्या वतीने ज्येष्ठ वकील अॅड एसची चिनॉय आणि अशोक मुदरगी यांनी याचिकेलाच जोरदार आक्षेप घेतला. याचिका केवळ गृहितकांवर आधारित आहे आणि आवश्यक कायदेशीर प्रक्रियेचा अवलंब न करता दाखल करण्यात आली आहे, असा दावा करून ती फेटाळण्याची मागणी केली. दरम्यान, दुपारच्या सत्रात राज्य सरकारच्या वतीने मुख्य सरकारी वकील अरुणा कामत – पै यांनी या प्रकरणात मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे विभागाने तक्रारीची प्राथमिक चौकशी सुरू केली असल्याची माहिती न्यायालयाला दिली.

ठाकरे कुटुंबीयाची मालमत्ता

■ उद्धव ठाकरे : १२५ कोटी
उद्धव ठाकरे यांच्या नावावर मुंबईत दोन बंगले आहेत. याशिवाय कर्जत येथे फार्महाऊस, विविध शेअर्स रश्मी ठाकरे ३४ लाख ८६ हजार ५५९ कंपन्यांमध्ये भागीदारी आहे. शेअर्समधून मिळणारा डिव्हिडंड हे उत्पन्न असून त्यांची एकूण संपत्ती १२५ कोटी

■ आदित्य ठाकरे यांची संपत्ती

बँक ठेवी – १० कोटी ३६ लाख रुपये
बाँड शेअर्स – २० लाख ३९ हजार रुपये
वाहन – बीएमडब्ल्यू किंमत ६ लाख ५० हजार रुपये दागिने – ६४ लाख ६५ हजार
इतर १० लाख २२ हजार
एकूण – ११ कोटी ३८ लाख
दोन व्यावसायिक प्रॉपर्टी – अंदाजे साडेतीन कोटी रुपये
कर्जत खालापूरला एक शेतजमिनीचा प्लॉट – अंदाजे ४४ लाख रुपये

■विधान परिषद निवडणुकीचा अर्ज भरतानाचे विवरण

उद्धव ठाकरे- ७६ कोटी ५९ लाख ५७ हजार ५७७
रश्मी ठाकरे संपत्ती- ६५ कोटी ०९ लाख ०२ हजार ७९१

■ बैंक डिपॉझिट्स

उद्धव ठाकरे – १ कोटी ६० लाख ९३ हजार ६७५
रश्मी ठाकरे – ३४ लाख ८६ हजार ५५९
हिंदू अविभक्त कुटुंब – ५६ लाख २१ हजार ४३९

■ शेअर्स

उद्धव ठाकरे – २१ कोटी ६८ लाख ५१ हजार १
रश्मी ठाकरे – ३३ कोटी ७९ लाख ६२ हजार ४६०

■सोने, दागिने

उद्धव ठाकरे – २३ लाख २० हजार ७३६
रश्मी ठाकरे – १ कोटी ३५ लाख २० हजार ९२९

■ मिळकत / व्याज

उद्धव ठाकरे ५८ लाख ५७ हजार २५९
रश्मी ठाकरे ५६ लाख १७ हजार ७१६ स्थावर मालमत्ता (जमिनीची किंमत)
उद्धव ठाकरे – ५२ कोटी ४४ लाख ५७ हजार ९८४
रश्मी ठाकरे २८ कोटी ९२ लाख ५९ हजार ३३६

■ कर्ज :

उद्धव ठाकरे – ४ कोटी ०६ लाख ०३ हजार ६२४
रश्मी ठाकरे- ११ कोटी ४४ लाख ३३ हजार १०९

 

Back to top button