कोल्हापूर : आडी मठाच्या हॉस्पिटलसाठी सर्वतोपरी सहकार्य : आ. हसन मुश्रीफ | पुढारी

कोल्हापूर : आडी मठाच्या हॉस्पिटलसाठी सर्वतोपरी सहकार्य : आ. हसन मुश्रीफ

कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : आडी (ता. निपाणी) येथील श्री. दत्त देवस्थानच्या वतीने वंदूर (ता. कागल) येथे उभारण्यात येणार्‍या 100 बेडच्या सुसज्ज हॉस्पिटलला सर्वतोपरी सहकार्य करू. या हॉस्पिटलमुळे सीमा भागातील जनतेला दिलासा मिळणार आहे, असे प्रतिपादन आ. हसन मुश्रीफ यांनी रविवारी केले.

आडी येथील श्री दत्त देवस्थान परिसरात सामूहिक जप सोहळा आयोजित केला आहे. या सोहळ्यास महाराष्ट्रासह कर्नाटकातील लोकप्रतिनिधी, उद्योगपती व भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमात ते बोलत होते.

श्री दत्त देवस्थान मठाचे अधिपती राजीवजी महाराज यांच्या संकल्पनेतून वंदूर येथे हॉस्पिटलची उभारणी सुरू आहे. रुग्णसेवा हीच ईश्वर सेवा या भावनेतून हॉस्पिटल बांधण्यात येत आहे. यामुळे कागल, निपाणी, चिकोडी, करवीर तालुक्यांना या तालुक्यासह सीमा भागातील रुग्णांना चांगल्या वैद्यकीय सुविधा मिळणार आहेत. माझ्या मतदारसंघात हॉस्पिटल होत असल्याचा मला आनंद होत आहे, असेही मुश्रीफ म्हणाले.

कार्यक्रमास कर्नाटकच्या मंत्री शशिकला जोल्ले, माजी ऊर्जा राज्यमंत्री वीरकुमार पाटील, आमदार चन्नराज हट्टीहोळी, माजी आमदार संजयबाबा घाटगे, काकासाहेब पाटील, युवराज पाटील, भैय्या माने आदी उपस्थित होते.

Back to top button