…उद्या मोठा निर्णय घेणार, उदयनराजे यांचा स्पष्ट इशारा | पुढारी

...उद्या मोठा निर्णय घेणार, उदयनराजे यांचा स्पष्ट इशारा

पुढारी ऑनलाइन डेस्क : खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांनी ‘उद्या आपली भूमिका स्पष्ट करणार’, असे म्हणत अप्रत्यक्षपणे इशारा दिला आहे. माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी ही माहिती दिली.

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी तसेच भाजपच्या अन्य नेत्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबत केलेल्या वक्तव्यावरून राज्याचे राजकीय वातावरण तापले आहे. महाराष्ट्राचे राजकारण अक्षरशः ढवळून निघाले आहे. शिवरायांबद्दल केलेल्या वक्तव्यावर सर्वच पक्षातील राजकीय नेते एकमेकांविरुद्ध आरोप प्रत्यारोप करत आहेत.

या एकूणच घटना प्रसंगांवर खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांना विचारले असता ते म्हणाले, छत्रपतींची तुलना कोणाशीही होऊ शकत नाही. त्यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्यामुळे आपण व्यथित आहोत. त्यामुळेच आपण उद्या रायगडावर जात आहोत, असे सांगितले. पुढे ते म्हणाले की रायगडावर आपल्याला शिवप्रेमी मिळतील. तिथे ते मेळाव्याला संबोधित करतील आणि त्याच वेळी ते आपली भूमिका स्पष्ट करतील, असे म्हणत त्यांनी अप्रत्यक्षपणे इशारा दिला आहे. त्यामुळे आता उद्या रायगडावर उदयनराजे नेमके काय बोलणार, त्यांची एकूण प्रकरणावर काय भूमिका मांडणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

मुख्यमंत्र्यांशी फोनवर चर्चेचे वृत्त फेटाळले

तर या दरम्यान यावेळी एका पत्रकाराने याप्रकरणावर आपली मुख्यमंत्र्यांशी चर्चा झाल्याचे बोलले जात आहे, असा प्रश्न विचारला असता त्यांनी याचा नकार दिला. आपल्याला कोणीही फोन केलेला नाही आणि आपले कोणाशीही बोलणे झालेले नाही, असे सांगत मुख्यमंत्र्यांशी फोनवर चर्चेचे वृत्त फेटाळले.

हे ही वाचा :

TATA IPL 2023 | आयपीएलचा लिलाव २३ डिसेंबरला, ९९१ खेळाडूंची नोंदणी

 

Back to top button