Mangaluru News : मंगळुरूमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवण्याच्या प्रस्तावावर काँग्रेसचा आक्षेप; वाचा कारण | पुढारी

Mangaluru News : मंगळुरूमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवण्याच्या प्रस्तावावर काँग्रेसचा आक्षेप; वाचा कारण

पुढारी ऑनलाईन डेस्क : मंगळुरू येथील महावीर सर्कल येथे छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा बसवण्यात येणार आहे. एमईएस महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवरील शांतता भंग करण्याचा प्रयत्न करत असताना छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवणे अयोग्य आहे. हे कारण सांगत या निर्णयाला मंगळुरू सिटी कॉर्पोरेशन (एमसीसी) काऊंसिलमधील काँग्रेस सदस्यांनी छत्रपती शिवाजी महारांजाचा पुतळा बसवण्याच्या प्रस्तावाला विरोध केला आहे. (Mangaluru News)

कर्नाटक-महाराष्ट्र सीमेवर शांतता भंग करण्याचा प्रयत्न करत असताना पुतळा नको 

एमसीसीच्या म्हणण्यानुसार, छत्रपती शिवाजी मराठा संघटनेच्या मागणीचा विचार करून एमसीसीने २९ ऑक्टोबरला झालेल्या बैठकीत छत्रपती शिवाजी महारांजाचा पुतळा बसवण्याच्या निर्णयाला मंजुरी दिली. विरोधी पक्षनेते नवीन डिसोझा यांनी बुधवारी, (दि. 30)  कर्नाटक विरुद्ध महाराष्ट्र एकीकरण समिती (एमईएस)ची भूमिका दर्शविणाऱ्या या निर्णयाला विरोध केला आहे. एमईएस कर्नाटक-महाराष्ट्र सीमेवर शांतता भंग करण्याचा प्रयत्न करत असताना शहरात छत्रपती शिवाजी महारांचा पुतळा उभारणे चुकीचे आहे, असा युक्तिवाद त्यांनी केला. दरम्यान, भाजपच्या सदस्यांनी काँग्रेस पक्षाच्या सदस्यांना फटकारले. जुन्या पक्षाने हिंदू नेत्यांना विरोध करण्याची सवय लावली आहे, असा आरोप केला आहे. दरम्यान, नगरसेवकांमध्ये शाब्दिक चकमक सुरू झाली. तर कॉंग्रसेच्या नेत्यांचं, असं म्हणणं आहे की, छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव हे महाराष्ट्रापुरते मर्यादित ठेवू नये.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या जागी तुलुनाडूचे योद्धे कोटी-चेन्नई यांचा पुतळा बसवण्याची सूचना काँग्रेस नेते डिसोझा यांनी महामंडळाला केली आहे. तर काँग्रेसचे सदस्य शशिधर हेगडे म्हणाले की, किनारी भागातील स्वातंत्र्यसैनिक आणि यश मिळविणाऱ्यांपैकी एकाच्या पुतळ्याचा विचार व्हायला हवा.

Mangaluru News : महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद

गेले काही दिवस महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद पुन्हा उफाळून आला आहे. कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्या वादग्रस्त विधानावरुन हा वाद वाढतचं गेला. बेळगाव हे महाराष्ट्रात यावे, महाराष्ट्राच्या या मागणीला कर्नाटकचा विरोध आहे. तर सोलापूरसह अक्कलकोटचा कर्नाटकमध्ये समावेश करावा अशी मागणी  केली जात आहे.

हेही वाचा 

Back to top button