UN : ‘लोकशाही’वर काय करावे हे भारताला सांगायची गरज नाही – रुचिरा कंबोज | पुढारी

UN : 'लोकशाही'वर काय करावे हे भारताला सांगायची गरज नाही - रुचिरा कंबोज

पुढारी ऑनलाइन डेस्क : UN : लोकतंत्राच्या बाबतीत काय करावे आणि काय नाही हे भारताला सांगायची गरज नाही, असे रुचिरा कंबोज यांनी म्हटले आहे. रुचिरा या संयुक्त राष्ट्रात भारताच्या पहिल्या महिला स्थायी प्रतिनिधी आहेत. भारताने गुरुवारी डिसेंबर महिन्यासाठी आयोजित केलेल्या 15 देशांच्या संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेचे अध्यपक्षपद ग्रहण केले. यावेळी पहिल्या दिवशी मासिक कार्य कार्यक्रमावर संयुक्त राष्ट्र मुख्यालयात पत्रकारांना संबोधित केले.

UN : यावेळी त्यांना विचारलेल्या भारतात लोकशाही आणि प्रेसच्या स्वातंत्र्यावर विचारलेल्या एका प्रश्नाचे उत्तर देताना त्यांनी लोकशाहीसाठी काय करायचे हे भारताला सांगायची गरज नाही, असे म्हटले आहे.

UN : त्या पुढे म्हणाल्या की, भारत जगातील सर्वात प्राचीन सभ्यता आहे. भारतात 2500 वर्षांपूर्वीपासून लोकशाही अस्तित्वात आहे. आम्ही नेहमीच लोकशाही राष्ट्र होतो. वर्तमानाबाबत सांगायचे झाले तर लोकशाहीचे चारही खांब कार्यरत आहेत. तसेच आता नवीन सोशल मीडिया जो खूपच जीवंत व सक्रिय आहे. त्यामुळे भारत जगातील सर्वात मोठा लोकशाही देश आहे.

UN : कंबोज म्हणाल्या, दर पाच वर्षात आम्ही जगातील सर्वात मोठी लोकतांत्रिक कवायत करतो. आमच्याकडे प्रत्येकाला आपले विचार मांडण्याचा अधिकार आहे आणि आमचा देश अशाच प्रकारे काम करतो आणि यात वेगात परिवर्तन करीत आहे.

हे ही वाचा :

Shraddha Walker Murder Case : ‘सोडून जाण्याची धमकी दिली म्हणून श्रद्धाचा खून केला’ – आफताब

भाजपकडून लोकसभा निवडणुकीची तयारी; गडकरी, गोयल यांचे दौरे

Back to top button