जीएसटी वसुलीत 11 टक्क्यांनी वाढ; “इतक्या” कोटींची वसुली | पुढारी

जीएसटी वसुलीत 11 टक्क्यांनी वाढ; "इतक्या" कोटींची वसुली

नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा :  सरत्या नोव्हेंबर महिन्यात जीएसटी वसुलीत 11 टक्क्यांनी वाढ झाली, अशी माहिती केंद्रीय अर्थ मंत्रालयाकडून गुरुवारी देण्यात आली. गेल्या वर्षीच्या नोव्हेंबर महिन्यात 1 लाख 31 हजार 526 कोटी रुपये जीएसटी वसुली झाली होती. त्या तुलनेत यंदाच्या नोव्हेंबरमध्ये 1 लाख 45 हजार 867 कोटींची जीएसटी वसुली झाली आहे.

विशेष म्हणजे, सलग नवव्या महिन्यात जीएसटी वसुलीचा आकडा 1 लाख 40 हजार कोटी रुपयांच्या पुढे राहिला आहे. सरत्या नोव्हेंबरमध्ये केंद्रीय जीएसटीच्या माध्यमातून 25 हजार 681 कोटी रुपयांची, राज्य जीएसटीच्या माध्यमातून 32 हजार 651 कोटींची कर वसुली झाली, तसेच आय-जीएसटीच्या माध्यमातून 77 हजार 103 कोटी रुपयांची वसुली झाली.

Back to top button