Gujarat Assembly Election 2022 : फॅमिली असावी तर अशी! कुटुंबातील ६० जणांनी एकाचवेळी केलं मतदान | पुढारी

Gujarat Assembly Election 2022 : फॅमिली असावी तर अशी! कुटुंबातील ६० जणांनी एकाचवेळी केलं मतदान

पुढारी ऑनलाईन डेस्क : कुटुंबातील भावंडांमध्ये किंवा वडील आणि मुलामधील वाद होत असल्याचे आपण अनेकदा पाहिले असले. पण गुजरातच्या कामरेजमधील सोलंकी कुटूंबाने लोकांसमोर एकीचा, सौहार्दाचा आणि नात्यातील बंधाचा अनोखा आदर्श घालून दिला आहे. सोलंकी कुटूंबात सध्या  81 सदस्य आहेत. हे कु़टूंब एकत्र राहतेच पण मतदान करतानाही एकत्रच मतदान करते. गुजरात निवडणुकीत (Gujarat Assembly Election 2022 ) त्यांनी एकत्र मतदान केलं आहे. परिसरात चर्चेचा आणि कौतुकाचा विषय ठरला आहे.

Gujarat Assembly Election 2022 : ८१ जणांचे एकत्र कुटूंब

कामरेजमधील सोलंकी कुटुंबात  81 सदस्य आहे. या कुटुंबाने निवडणूक प्रक्रियेत सहभागी होणे किती महत्त्वाचे आहे, हा संदेश दिला आहे. कुटुंबातील ज्येष्ठ मतदार 82 वर्षांचे शामजीभाई आहेत आणि सर्वात लहान 18 वर्षांचे पार्थ आणि वेदांत हे आहेत. पार्थ आणि वेदांत हे प्रथमच मतदार आहेत.

८१ पैकी ६० मतदार एकाच घरात

सोलंकी कुटुंबाने नवाग्राम मतदान केंद्रावर मतदान केलं. 81 सदस्यांपैकी 60 मतदार नोंदणीकृत आहेत. शामजीभाईंचा मुलगा नंदलाल म्हणाले, “वयाच्या ८२ व्या वर्षी माझे वडील मतदान करण्यासाठी खूप उत्साही होते आणि आम्हा सर्वांना मतदान करण्यासाठी प्रेरित करतात.” सोळंकी कुटुंबातील घनश्याम  हे 17 भावांपैकी एक ते म्हणाले, “आम्ही एकत्र कुटुंबात लग्न समारंभात ज्या उत्साहाने सहभाग घेतो त्याच पद्धतीने मतदानात सहभागी होतो. याद्वारे आम्ही इतरांना निवडणुकीत सहभागी होण्यासाठी प्रोत्साहित करण्याचा उद्देश असतो. एक मजबूत राष्ट्र बनवण्यासाठी कुटुंबाने एकमताने एकत्र मतदान करण्याचा निर्णय घेतला. आम्ही जात किंवा इतर कोणत्याही भ्रमात जाणार नाही

शेतीच्या उपकरणांचे उत्पादन

 व्यवसायाने लोहार असलेले लालजी सोलंकी हे सहा भावांपैकी एक. ते बोटाडच्या लाखियानी राहत होते. 1985 मध्ये कामरेज शहरात आले आणि स्थायिक झाले. त्यांनी आपल्या भावांच्या मदतीने शेतीची उपकरणे बनवण्यास सुरुवात केली. हळूहळू कुटुंब वाढले. सध्या कुटुंबातील सदस्यसंख्या 96 आहे त्यापैकी 15 गावात राहतात तर 81 कामरेजमध्ये राहतात. सोलंकी कुटुंबातील सदस्य प्रदीप म्हणाला, “आम्ही आता शेतीच्या उपकरणांचे उत्पादन युनिट चालवतो आणि ज्योती नावाचा ब्रँड विकसित केला आहे. एकत्रितपणे व्यवसाय चालवतो.

Gujarat Assembly Election 2022 : एकत्र कुटुंबाचे फायदे आहेत, म्हणून…

सोलंकी कुटुंबातील महिला सदस्य सांगतात की, “बहुतेक सदस्य संयुक्त कुटुंबात राहतात, आणि त्याचे फायदे आहेत. आम्ही जबाबदाऱ्या वाटून घेतो त्यामुळे प्रत्येकाला थोडा मोकळा वेळ मिळतो”.

हेही वाचा 

Back to top button