सोने आयातीमध्ये सात महिन्यांत १७.३४ टक्क्यांनी घट | पुढारी

सोने आयातीमध्ये सात महिन्यांत १७.३४ टक्क्यांनी घट

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा :  एप्रिल ते ऑक्टोबर या सात महिन्यांच्या कालावधीत सोन्याच्या आयातीमध्ये 17.34 टक्क्यांनी घट झाली आहे. केंद्रीय व्यापार मंत्रालयाकडून ही माहिती देण्यात आली. गतवर्षी वरील कालावधीत 29 अब्ज डॉलर्सची सोन्याची आयात झाली होती, त्या तुलनेत यंदाच्या एप्रिल – ऑक्टोबर कालावधीत 24 अब्ज डॉलर्सची सोने आयात झाली.

सोन्याच्या आयातीचा परिणाम देशाच्या व्यापार तुटीवर होत असतो. त्यामुळे सोने आयात प्रमाणाच्या बाहेर जाऊ नये, याकडे सरकारचे लक्ष असते. यंदा सात महिन्यात मागणी कमी झाल्याने सोने आयात घटली असल्याचे व्यापार मंत्रालयाचे म्हणणे आहे. केवळ ऑक्टोबर महिन्याचा विचार केला तर या महिन्यात 3.7 अब्ज डॉलर्सची सोने आयात झाली.

गतवर्षीच्या ऑक्टोबरच्या तुलनेत आयात घट 27.47 टक्के इतकी होती. ऑक्टोबरमध्ये चांदीची आयात सुध्दा 34.80 टक्क्याने कमी होऊन 585 दशलक्ष डॉलर्सवर आली आहे. एप्रिल ते ऑक्टोबर या सात महिन्यात मात्र चांदीची आयात 1.52 अब्ज डॉलर्सच्या तुलनेत वाढून 4.8 अब्ज डॉलर्स इतकी झाली.

हेही वाचा 

Back to top button