Sara Ali Khan : बिकिनीत सारा स्विमिंग पूलावर पोहतेय की सायकलिंग करतेय | पुढारी

Sara Ali Khan : बिकिनीत सारा स्विमिंग पूलावर पोहतेय की सायकलिंग करतेय

पुढारी ऑनलाईन डेस्क : बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानची मुलगी सारा अली खान ( Sara Ali Khan ) गेल्या काही दिवसांपासून शुभमन गिलसोबतच्या रिलेशनशीपमुळे चर्चेत आहे. यासोबत तिच्या प्रत्येक चित्रपटातील जबरदस्त अभिनयासोबत ती सोशल मीडियावर सक्रिय असते. साराचे सोशल मीडियावर एकापैक्षा एक बोल्ड आणि हॉट फोटोज पाहायला मिळतात. सध्याही साराचा असाच हॉट फोटोने सोशल मीडियाचे तापमान वाढविले आहे.

अभिनेत्री सारा अली खान ( Sara Ali Khan ) नुकतेच तिच्या इन्स्टाग्रामवर कलरफुल टू पीस बिकिनीमधील एक फोटो शेअर केला आहे. यात सारा एका स्वमिंग पूलावर सायकल हातात घेवून उभी असल्याचे दिसतेय. यावेळी साराने कलरफुल बिकिनीवर व्हाईट रंगाचा नाईट सूट परिधान केला आहे. यावेळी तिच्या आजूबाजूला पाणीच- पाणी आणि थोड्या अंतरावर हिरवी गार झाडे दिसतात. यावेळी तिने खूपच किलर आणि हॉट पोझ दिली आहे. ओल्या मोकळ्या केसांची स्टाईल, गळ्यात लॉकेट आणि मोत्याची माळ आणि पायात चप्पलने तिने तिचा लूक पुर्ण केला आहे.

साराने फोटोच्या कॅप्शनमध्ये ‘स्वतःवर संपूर्ण विश्वास ठेवा. तुमच्या कम्फर्ट झोनमधून थोडे बाहेर या आणि मला थोडा वेळ द्या. साथीदारांचा दबावात राहू नका. आयुष्य सुंदर आहे त्याचा आनंद घ्या. तुमच्या कामात इतके मग्न होऊ नका की, तुम्हाला जीवनाच्या आंनद घेता येणार नाही.’ असे म्हटले आहे. यातील खास म्हणजे, सारा मस्त एन्जॉय करताना आणि स्विमिंग पूलाच्या पाण्याकडे टक लावून पाहताना मोहक दिसतेय. यात साराने फिगर मेन्टेंट केलीय.

साराचा हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताच ४० मिनिटांत दोन लाखांहून अधिक जणांनी तर आतापर्यत जवळपास साडेतीन लाखांहून अधिक जणांनी लाईक्स केला आहे. या फोटोवर एका युजर्सने ‘हुशार.’ ‘तू जलपरीसारखी सुंदर दिसत आहेस आणि बीचवर सायकल चालवत आहेस.’ ‘तुम्ही खरोखरच खूप चांगली पोस्ट केली आहे.’ ‘तुम्ही या टूपीस बिकिनीमध्ये खूप सुंदर दिसत आहात.’ असे म्हटलं आहे.

सारा अली खान शेवटची ‘कुली नंबर १’ या चित्रपटात दिसली होती. या चित्रपटात सारासोबत वरुण धवनने मुख्य भूमिका साकारली होती. नुकतेच सारा इफ्फी फिल्म फेस्टिव्हलच्या निमित्ताने गोव्यात पोहोचली आहे.

हेही वाचलंत का? 

 

View this post on Instagram

 

A post shared by Sara Ali Khan (@saraalikhan95)

 

View this post on Instagram

 

A post shared by Sara Ali Khan (@saraalikhan95)

 

View this post on Instagram

 

A post shared by Sara Ali Khan (@saraalikhan95)

 

View this post on Instagram

 

A post shared by Sara Ali Khan (@saraalikhan95)

Back to top button