Salman Khan : सलमान खानची पहिली गर्लफ्रेंड कोण होती? - पुढारी

Salman Khan : सलमान खानची पहिली गर्लफ्रेंड कोण होती?

पुढारी ऑनलाईन डेस्क : सलमान खान (Salman Khan) आणि त्याची प्रेम प्रकरणं सिनेमासृष्टीत एक मोठा चर्चेचा विषय आहे. ऐश्वर्या रायपासून कॅटरिना कैफपर्यंत सर्वांना सलमाने डेट केलं आहे. पण, तुम्हाला माहितीय का… सलमानला अवघ्या १९ व्या वर्षी प्रेम झालेलं होतं अन् त्याची ही पहिली गर्लफ्रेंड होती. तिच्याशी तो लग्नही करणार होता. तर, सलमानची पहिली गर्लफ्रेंड कोण होती, ते पाहू…

salman khan

सर्वांना असं वाटतं की, १९८० मध्ये मिस इंडिया झालेली संगीता बिजलानी ही सलमान खानची पहिली गर्लफ्रेंड आहे. पण, संगीता ही सलमानची (Salman Khan) पहिली गर्लफ्रेंड नव्हती. तर सलमान खानची पहिली गर्लफ्रेंड ही शाहीन जाफरी होती. हे सलमानचे पहिलं प्रेम होतं.

salman khan

या गोष्टीचा खुलासा सलमान खानचं आत्मचरित्र असलेल्या ‘बिइंग सलमान’ लेखिका जरीन खान हिने केलेला आहे. तेव्हा सलमान खान हा १९ वर्षांचा होता. त्यावेळी सलमानच्या आयुष्यात शाहीनची एंट्री झाली आणि तिच्या प्रेमात सलमान पडला.

तर, सलमान खानच्या पहिल्या गर्लफ्रेंडचं नाव शाहीन जाफरी असून ती पूर्वी माॅडेल म्हणूनही प्रसिद्ध होती. विशेष हे की, शाहीन जाफरी ही अभिनेत्री कियारा अडवाणीची काकी आहे. त्याचबरोबर सुपरस्टार अशोक कुमारती नात आहे.

salman khan

कियाराने एका मुलाखतीत सांगितले की, माझी सलमानला चांगली ओळखत होती. कारण, ते दोघे चांगले मित्र होते. ते लहानपणी एकत्र सायकल चालवत होते. माझ्या आईने माझ्या मावशीची म्हणजेच शाहीन जाफरी आणि सलमान खानची भेट घडवून आणली होती. त्यानंतर ते एकमेकांना डेट करू लागले.

हेही वाचलंत का?

Back to top button