Sputnik Light: 'स्पुटनिक लाईट'च्या तिसऱ्या टप्प्यातील चाचणीचा मार्ग मोकळा | पुढारी

Sputnik Light: 'स्पुटनिक लाईट'च्या तिसऱ्या टप्प्यातील चाचणीचा मार्ग मोकळा

नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा : Sputnik Light : कोरोना महारोगराईचा सामना करण्यासाठी रशियाकडून विकसित करण्यात आलेली स्पुटनिक लाईट या लसीच्या तिसऱ्या टप्प्यातील ट्रायलला मंजूरी देण्यात आली आहे. ड्रग कंट्रोलर जनरल इंडियाने (डीसीजीआय) देशातील लोकसंख्येवर लसीचे परीक्षण करण्यास हिरवा कंदील दाखवला आहे.

डीजीसीआयच्या विशेषतज्ञ समितीने नुकतीच स्पुटनिक लाईटच्या ट्रायलची शिफारस केली होती. रशियातील लसीकरणात स्पुटनिक लाईटचा वापर केला जात आहे.

अशात भारतात ही लस वापरण्याच्या अनुषंगाने या लसीचा देशवासियांना वर होणाऱ्या प्रभावाचा अभ्यास करण्यासाठी तिसऱ्या टप्प्यातील ‘ब्रिजिंग’ट्रायल करण्यात येणार आहे.

यापूर्वी जुलै महिन्यात सेंट्रल ड्रग्स स्टँडर्ड कंट्रोल ऑर्गेनाइजेशनच्या (सीडीएससीओ) विशेष तज्ञ समितीने ने स्पुटनिक लाईटच्या आपत्कालीन वापरासाठी परवानगी देण्यास नकार दिला होता.

दरम्यान, डॉ. रेड्डीज प्रयोगशाळेने रशियन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट फंड (आरडीआयएफ) सोबत गेल्या वर्षी भारतात स्पूटनिक-व्ही च्या तिसऱ्या टप्प्याच्या चाचणीसाठी करार केला होता.

‘द लॅन्सेट’ मध्ये अलीकडे प्रकाशित झालेल्या एका अभ्यासानुसार स्पुटनिक लाईट कोरोना विरोधात ७८.६-८३.७ टक्के प्रभावी असल्याचा दावा करण्यात आला आहे.

अर्जेंटिनामधील ४० हजार वृद्धांवर करण्यात आलेल्या अभ्यासाच्या निष्कर्षाच्या आधारे हा दावा करण्यात आला, हे विशेष. लसीचे तिसऱ्या टप्प्यातील निष्कर्ष समाधानकारक आढळल्यास देशाच्या लसीकरण अभियानात तिला समाविष्ट केले जाऊ शकते.

Back to top button