Mumbai : वरळी समुद्रात पाच मुले बुडाली, दोघांचा मृत्यू | पुढारी

Mumbai : वरळी समुद्रात पाच मुले बुडाली, दोघांचा मृत्यू

मुंबई : Mumbai : पुढारी वृत्तसेवा वरळी कोळीवाड्याजवळील समुद्रात पाच मुले वाहून गेल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी घडली. यातील कार्तिक चौधरी (८) आणि सविता पाल (१२) यांचा या दुर्घटनेत मृत्यू झाला आहे. या घटनेने वरळीमध्ये एकच खळबळ उडाली आहे.

शुक्रवारी दुपारी साडे तीन वाजण्याच्या सुमारास कार्तिकी पाटील (१३), आर्यन चौधरी (१०), ओम पाल (१४), कार्तिक चौधरी (८) आणि सविता पाल (१२) ही पाच मुले वरळीतील कोळीवाडा येथे समुद्रात पोहण्यास गेली होती. ही पाचही मुले समुद्रात वाहून गेली.

मुले वाहून जात असल्याची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी समुद्रात उड्या घेत य मुलांना बाहेर काढले. स्थानिक नागरिकांनीच या मुलांना खासग वाहनांनी जवळच्या रुग्णालयात दाख केले. हिंदुजा रुग्णालयात दाखल केलेल्या ८ वर्षीय मुलगा कार्तिक आणि १२ वर्षीय मुलगी सविता यांना डॉक्टरांनी दाखलपूर्व मृत घोषित केले तर, आर्यन आणि ओम यांच्यावर हिंदुजा आणि कार्तिकी हिच्यावर केईएम रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

हे ही वाचा :

Mumbai Local Mega Block : जाणून घ्या 27 तासांच्या मेगाब्लॉक दरम्यान वाहतुकीचे पर्यायी मार्ग

स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या जन्मभूमीत बंद ; राहुल गांधी यांच्या वक्तव्याचा निषेध

Back to top button