चंद्रकांत पाटील म्हणाले, माझ्या परप्रांतीयांसंदर्भातील वक्तव्याचा विपर्यास | पुढारी

चंद्रकांत पाटील म्हणाले, माझ्या परप्रांतीयांसंदर्भातील वक्तव्याचा विपर्यास

मुंबई, पुढारी ऑनलाईन : बलात्कार प्रकरणासंदर्भात परप्रांतीयांच्या मुद्द्यावर मी केलेल्या भाष्याचा विपर्यास केला आहे. गुन्हेगारांना जशी जात-धर्म नसते, तसंच परप्रांतीय वगैरे ही प्रकार नसतो. गुन्हेगार हा गुन्हेगारच असतो. त्यामुळे माझ्या वक्तव्याचा विपर्यास करु नये, असे चंद्रकांत पाटील म्हणाले.

साकीनाका बलात्कार प्रकरणानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पोलिस अधिकाऱ्याची तातडीची बैठक बोलविली होती.

या बैठकीत परप्रांतीयांची नोंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. या संदर्भात बोलताना चंद्रकांत पाटील यांनी परप्रांतीयच अत्याचार करतात का? महाराष्ट्रीयन माणूस असे कृत्य करत नाही का? असे वक्तव्य केले होते.

काय म्हणाले होते आमदार पाटील

परप्रांतीयच अत्याचारासारखे गुन्हे करतात का? महाराष्ट्रीय माणूस असे कृत्य करत नाही का? गुन्हे आणि अत्याचारांच्या घटनेवरून एखाद्या समाजाला लक्ष करणे योग्य नाही. शक्ती कायद्याला सर्वांनीच पाठिंबा द्यायला हवा. मात्र, कोवीडच्या काळात सरकारने शक्ती कायद्यासंबंधी बैठक का घेतली नाही? याचे उत्तर देणे गरजेचे आहे. एखाद्या समाजाला लक्ष करणे दुदैवी असून गुन्ह्यांचा अभ्यास केला तर वेगळेच सत्य बाहेर येईल.’

हेही वाचा : 

Back to top button