'तो दिवस येत आहे, जेव्हा मी शांत होईन'; Mars InSight lander होणार नष्ट : नासाची माहिती | पुढारी

'तो दिवस येत आहे, जेव्हा मी शांत होईन'; Mars InSight lander होणार नष्ट : नासाची माहिती

पुढारी ऑनलाईन डेस्क : गेल्या चार वर्षांपासून मंगळावर स्थित असलेल्या इनसाइट लँडरने (Mars InSight lander) पृथ्वीवर संदेश पाठवला आहे. मंगळावरून आलेल्या या संदेशात म्हटलं आहे की, “तो दिवस येत आहे जेव्हा मी शांत होईन.”  तसेच या लँडरने आपण नष्ट का होत आहोत, याचे कारण देखील सांगितले आहे.

माझ्या सौर पॅनेलवर धूळ जमा झाली आहे. त्यामुळे वीज निर्माण करणे कठीण झाले आहे. येथील वीज देखील वेगाने कमी होत आहे. त्यामुळे बऱ्यापैकी सर्व वैज्ञानिक क्रिया पूर्णपणे बंद होण्याच्या मार्गावर आहेत, असे मंगळावरील या इनसाइट लँडरने (Mars InSight lander)  सांगितल्याचे नासाने ट्विट केले आहे.

 

“मंगळ या लाल ग्रहाचा अभ्यास करण्याचा माझा चार वर्षाचा कालावधी संपत आहे. माझा वेळ संपत असल्याने, मी जी काही आजपर्यंत गोळा केले आहे, त्याचा माझ्या टीमला फायदा होईल,” असा संदेश इनसाइट लँडरने नासाच्या शास्त्रज्ञांना पाठवला असल्याचे नासाकडून सांगण्यात येत आहे.

यामुळे करता नाही येणार दुरूस्ती

या प्रोजेक्टमधील शास्त्रज्ञांच्या टीमने लँडरमध्ये डस्ट वायपर का जोडले जाऊ शकत नाही याविषयी स्पष्टीकरण दिले आहे. टिमने म्हटलं आहे की, यामुळे या मिशनचा खर्च, वस्तुमान आणि गुंतागुंत वाढली असती. उद्दिष्टे पूर्ण करण्याचा सर्वात किफायतशीर मार्ग हा संपूर्ण मिशनला उर्जा देण्याइतके मोठे सौर पॅनेल असणे हा आहे; पण ते अल्प काळासाठीचे मिशन यासाठी कोणतेही प्रयत्न करण्यात येणार नसल्याचे टीमकडून सांगण्यात आले आहे.

चार वर्षात मंगळावरील विविध प्रकरची माहिती शोधली

या संदेशात एका मंगळ वर्षासाठी (म्हणजे पृथ्वीवरील सुमारे दोन वर्षे) लाल ग्रहाचा अभ्यास करणे हे माझे ध्येय होते; पण मी ते दुप्पट करू शकलो. मी संकलित केलेल्या वैज्ञानिक माहितीने बर्‍याच प्रश्नांची उत्तरे दिली आहेत. इनसाइटने मंगळ गृहाचे कवच, आवरण आणि पृष्ठभाग या तीन प्रमुख स्तरांबद्दल नवीन माहिती गोळा केली आहे. तसेच भविष्यातील संशोधनासाठी अनेक नवीन प्रश्न निर्माण केल्याचेही शास्त्रज्ञांनी म्हटलं आहे. या अंतराळ यानाने मंगळावरील 1,300 हून अधिक भूकंपाच्या घटना शोधल्या आणि पुष्टी देखील केली आहे. त्यापैकी ५० हून अधिक मंगळावरील त्यांच्या स्थानाबद्दल माहिती मिळविण्यासाठी टीमला पुरेसे स्पष्ट सिग्नल दिले होते.

हेही वाचा : 

 

Back to top button