Mahira Organ Donation :  ‘मरावे परी अवयवरूपी उरावे’; 18 महिन्यांच्या माहिरामुळे अनेकांना मिळाले जीवनदान  | पुढारी

Mahira Organ Donation :  ‘मरावे परी अवयवरूपी उरावे’; 18 महिन्यांच्या माहिरामुळे अनेकांना मिळाले जीवनदान 

पुढारी ऑनलाईन डेस्क : ‘मरावे परी अवयवरूपी उरावे’ असं कधीतरी ऐकलं असाल. असचं काहीसं १८ महिन्यांच्या माहिराच्या बाबतीत घडलं आहे. माहिराच वयं अवघ १८ महिन्यांचं. तिच्या मृत्यूनंतर तिच्या घरच्यांनी तिचं अवयवदान करण्याचं ठरवलं. या निर्णयामुळै
अनेकांना जीवनदान मिळालं आहे.  १८ महिन्याच्या  मुलानंतर अवयव दान करणारी  एनसीआरमधील (दिल्ली) दुसरी सर्वात लहान मुलगी ठरली आहे माहिरा. (Mahira Organ Donation) माहिराच्या अगोदर आणखी एका १८ महिन्यांच्या मुलाचे अवयवदान करण्यात आले होते.

दान विविध स्वरुपात करता येत. उदा. रक्तदान, अन्नदान, अवयव दान, देहदान आदी स्वरुपात करता येते. पण आपण करत असलेले दान ते गरजू व्यक्तिंना केले तर त्याला अधिक महत्व प्राप्त होते. असंच एका अवघ्या १८ महिन्यांच्या मुलीचं अवयव दान हे अनेकांना जीवनदान देवून गेलं आहे. या मुलीचं नाव आहे माहिरा.

माहिरा मुळची हरियाणा राज्यातील नुह जिल्ह्यातील मेवात शहरातील. ती आपल्या घराच्या खेळतं असताना बाल्कनीतून पडली. हा अपघात सहा नोव्हेंबरला झाला होता. त्यानंतर तिला तात्काळ एआयआयएमएस(AIIMS-All India Institute Of Medical Sciences, New Delhi) मध्ये दाखल करण्यात आले. तिथे तिच्यावर उपचार सुरु होते. नोव्हेंबर ११ रोजी तिला ब्रेन डेड घोषीत करण्यात आले. तिला ब्रेन डेड घोषीत केल्यानंतर तिच्या कुटूंबियांनी तिच्या अवयव दान करायचे ठरवलं.

अन् कुटं बीय अवयवदानाला तयार झाले

गेल्या सहा महिन्यात एम्सच्या ट्रॉमा सेंटरमध्ये  अवयव दान करणारी माहिरा ही  तिसरं लहान मुलं ठरली आहे. रॉली हे पहिले मूल होते, त्यानंतर १८ महिन्यांच्या रिशांतने अवयव दान केले होते. त्यानंतर माहिरा ही तिसरी ठरली आहे. डॉ दीपक गुप्ता यांनी  रॉलीच्या अवयव दानाच उदाहरण  माहिराच्या वडिलांना सांगितलं.  त्यांना अवयवदानाचे महत्व समजावून सांगितले. त्यानंतर ते माहिराच्या अवयवदानाला तयार झाले.

Mahira Organ Donation : अनेकांना मिळाला जीवनदान

त्यानंतर तिचं  यकृत (liver) सहा वर्षाच्या मुलाल दिलं. ही प्रत्यारोपण आयएलबीएस, दिल्ली (ILBS-Institute of Liver and Biliary Sciences) येथे करण्यात आल. तिच्या दोन्ही किडण्या १७ वर्षाच्या व्यक्तीला देण्यात आल्या. हे प्रत्यारोपण एआयआयएमएस येथे करण्यात आले. डोळे  आणि ह्रदय हे नंतर गरजु व्यक्तीला देण्यासाठी जतन करण्यात आले आहे. ही अवयव प्रत्यारोपण करण्यात सहभागी असलेल्या डॉक्टरांनी सांगितले आहे. मयत झालेल्या माहिराच्या घरच्यांनी स्वत:ला सांभाळत आपल्या चिमुकलीचं अवयवदान करण्याचं ठरवलं. हा निर्णय अनेकांच्या आयुष्याला अर्थ देवुन गेला,

काय आहे भारतात अवयवदानाची स्थिती

अवयव प्रत्यारोपणातील तज्ज्ञ  डॉक्टरांच्या मते, ग्रामीण भागात अवयवदानाबाबत जागृती अधिक आहे.  ते असेही  म्हणाले की बहुतेक नकार ज्येष्ठ सदस्यांकडून येतात ज्यांनी त्यांच्या आयुष्यात कधीही अवयव दान केल्याचे ऐकलेले नसते. भारतात सद्या प्रति दशलक्ष अवयव दान दर ०.४ आहे. हे प्रमाण जगातील सर्वात कमी आहे. तर यूएसए आणि स्पेनमध्ये सध्या प्रति दशलक्ष लोकसंख्येचे अवयव दान दर 50 आहेत. भारतात सरासरी 700 अवयवदाते मेंदूच्या मृत्यूनंतर अवयव दान करतात. यूएसएने अलीकडेच सप्टेंबर 2022 मध्ये 1 दशलक्ष अवयव दान पूर्ण केले आहे.

डॉक्टर पुढे म्हणाले की AIIMS दिल्लीने अलीकडच्या काळात नवीन नेतृत्वाखाली अवयव खरेदी उपक्रमात बदल केले आहेत, परिणामी गेल्या सहा महिन्यांत अवयवदानात लक्षणीय वाढ झाली आहे. ते म्हणाले की या वर्षी दिल्लीतील एम्समध्ये एकूण 14 अवयवदान झाले आहेत – 1994 नंतरची ही सर्वाधिक संख्या आहे. (ANI)

अवयवदान दोन प्रकारचे

अवयवदान बद्दल अनेकांच्या मनात बरेच गैरसमज असतात. त्यातील एक म्हणजे अवयवदान हे आपण मयत झाल्यानंतरच करता येत. पण अवयवदान व्यक्तीच्या हयातीत आणि तो मृत झाल्यानंतरही करु शकतो. जेव्हा व्यक्ती जिवंत असते तेव्हा ती आपले  अवयवदान    (Living Donor Organ Donation) करु शकतात. आणि व्यक्ती मृत झाल्यानंतरही जीवनदान करु शकतो. (Deceased Donor Organ Donation)

हेही वाचा

Back to top button