अमित शहांची इंटेलिजन्स ब्युरोच्या अधिका-यांसाेबत बैठक; ‘या’ महत्वाच्या मुद्द्यांवर चर्चा | पुढारी

अमित शहांची इंटेलिजन्स ब्युरोच्या अधिका-यांसाेबत बैठक; 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर चर्चा

पुढारी ऑनलाईन : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी नवी दिल्ली येथे देशभरातील इंटेलिजन्स ब्युरो अधिकाऱ्यांची उच्चस्तरीय बैठक घेतली. यामध्ये देशाच्या अंतर्गत सुरक्षा परिस्थितीचा आढावा घेतला. या बैठकीत राष्ट्रीय सुरक्षेशी संबंधित विविध मुद्द्यांवर विस्तृत चर्चा करण्यात आली. ज्यात दहशतवादाचा मुकाबला, अतिरेकीपणाचा धोका, सायबर सुरक्षेशी संबंधित मुद्दे, सीमेशी संबंधित पैलू आणि राष्ट्राच्या अखंडतेला आणि स्थैर्याला सीमापार घटकांकडून येणारे धोके यांचा समावेश आहे, अशी माहिती गृहखात्याकडून देण्यात आली आहे.

राष्ट्रीय राजधानी नवी दिल्ली येथे सकाळी 11 वाजता सुरू झालेल्या आणि संध्याकाळी 5 वाजेपर्यंत तब्‍बल 6 तास ही बैठक सुरू होती. या बैठकीदरम्यान, गृहमंत्र्यांनी दहशतवादविरोधी आणि अंमली पदार्थ विरोधी एजन्सींमधील संपर्क वाढविण्याच्या प्रक्रियेला अधिक बळकट करण्याचर ही चर्चा केली.

अमित शाह यांनी देशाची सुरक्षा आणि सरकारची वचनबद्धता या बाबी अधोरेखित केल्‍या. देशात स्वातंत्र्य मिळाल्यापासून शांतता राखण्यात अत्यंत महत्त्वपूर्ण योगदान दिल्याबद्दल गुप्तचर संस्थेचे त्‍यांनी कौतुक ही केले.

पुढे बोलताना ते म्‍हणाले, आपली लढाई ही दहशतवादाविरुद्धची आहे. जोपर्यंत आपण या विरुद्ध लढत नाही तोपर्यंत दहशतवादावर विजय मिळू शकरणार नाही. देशाची किनारपट्टीची सुरक्षा मजबूत करण्याचे निर्देश आयबीच्या मुख्यालयात आणि राज्यांमधील सहायक गुप्तचर ब्युरो अधिकाऱ्यांना दिले. तसेच आपण लहान, बंदरासह सर्व बंदरावर लक्ष ठेवावे असे ते म्‍हणाले.

तसेच, अंमली पदार्थांवर ते म्हणाले, अंमली पदार्थामुळे केवळ देशातील तरुणांचा नाश होत नाही तर त्यातून कमावलेल्या पैशाचा देशाच्या अंतर्गत सुरक्षेवरही परिणाम होत आहे. म्हणूनच याचा नायनाट करण्यासाठी आपल्याला एकत्र काम करावे लागणार आहे, असे शाह म्‍हणाले.

हेही वाचा  

नगर : सत्ताधार्‍यांसमोर नवख्यांचे आव्हान ; शहर सहकारी बँकेसाठी 33 उमेदवारी अर्ज

पुणे : उर्दू शाळांतील शिक्षक भरती लवकरच : शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर

कोल्हापूर : प्राधिकरणातील 9 गावांना दुप्पट पाणीपट्टीचा बोजा

Back to top button