Mumbai Crime : रात्रीच्या वेळी समुद्रात थरारक जॉयराइडसाठी त्याने दारूच्या नशेत चक्क बोट चोरली! | पुढारी

Mumbai Crime : रात्रीच्या वेळी समुद्रात थरारक जॉयराइडसाठी त्याने दारूच्या नशेत चक्क बोट चोरली!

पुढारी ऑनलाइन डेस्क : Mumbai Crime : भर समुद्रात रात्रीच्या वेळी बोटीतून थरारक जॉयराईडचा आनंद उचलण्यासाठी एका व्यक्तीने दारुच्या नशेत चक्क बोट चोरली. त्यानंतर त्याने तब्बल 36 तास समुद्रात बोट चालवली. बोटच्या मालकाने सकाळी बोट चोरीला गेल्याची तक्रार दिली त्यानंतर बोटीचा शोध घेतला असता आरोपीला पक़़डल्यानंतर घटना उघडकीस आली.

विकास असे या बोट चोरट्याचे नाव असून तो डॉकमध्ये मजूर म्हणून कामाला आहे. त्याने आपल्याच मालकाची बोट चोरली. याप्रकरणी बोट मालक फ्रान्सिस डंबर असे नाव आहे. तर साव पेद्रू – सेंट पीटर असे बोटीचे नाव होते.

Mumbai Crime : पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार घटनेची माहिती अशी की, फ्रान्सिस डांबर हे वसईतील रहिवासी. त्यांच्याजवळ मासेमारीची बोट होती. ‘साव पेद्रू’ नावाची बोट त्यांनी पाचू बंदरात डॉक केली होती. त्यांच्याकडे आरोपी विकास हा नुकताच मजूर म्हणून कामावर रुजू झाला होता. तो पालघर जिल्ह्यातील आदिवासी आहे इतकीच माहिती होती.

बुधवारी सकाळी बोट न आढळल्याने मालक फ्रान्सिस याने बोटीचा शोध घेतला. मात्र, बोट न सापडल्याने त्यांनी पोलिसांमध्ये तक्रार दिली. तसेच चौकशी त्यांनी मजूर विकास देखिल कुठेच सापडत नाही, अशी माहिती दिली. त्याला मंगळवारी सायंकाळी शेवटचे पाहिले होते. दिलेल्या तक्रारीनुसार पोलिसांनी शोध सुरू केला.

Mumbai Crime : दरम्यान, आरोपी विकास याने जॉयराईडचा आनंद घेण्यासाठी बोट वसईच्या किना-यापासून बुधवारी पहाटे मुंबईच्या नैऋत्याला कोकणाकडे जहाज चालवले. त्याने समुद्रात तब्बल 220 किमी अंतर रायडिंगचा थरार घेतला. पोलीस आणि तटरक्षक दलाने एकीकडे बोट चोरट्याचा शोध सुरू केला होता. त्यांनी राज्यभरातील मच्छिमरांना तपशील पाठविला. माहिती मिळाल्यानंतर दक्षिण मुंबईतील ससून गोदीजवळ मच्छिमारांनी बुधवारी सकाळू वसईची एक बोट वेगाने कोकणकडे जात असल्याची माहिती दिली.
मासेमारी समुदायातील सदस्यांनी सांगितले की ते बोट ओळखू शकतात कारण प्रत्येक मासेमारी गावाची नौकेसाठी विशिष्ट रचाना असते. त्यामुळे बोट ओळखू आली.

Mumbai Crime : दरम्यान, चोरट्याने बोट पळवली तेव्हा त्या बोटीत 200 लिटर डिझेल होते. 36 तास बोट चालवल्यानंतर तो रायगडच्या श्रीवर्धन किना-यावर पोहोचला तेव्हा बोटीतील डिझेल संपले. त्यानंतर तो शुद्धीवर आला. पोलिसांना श्रीवर्धन किना-याजवळ बोट आढळ्याची माहिती मिळाली. त्यांनी आरोपीला श्रीवर्धन येथे पकडले.

पोलिसांच्या चौकशीत त्याने मद्यधुंद अवस्थेत हे कृत्य केल्याचे लक्षात आले. दारुच्या नशेत त्याने समुद्रात थरारक जॉयराईडसाठी बोट चोरल्याची माहिती दिली. आरोपी विकास याने यापूर्वी ससून डॉकमध्ये काम केले होते. त्यामुळे त्याला वसई ते गोदीपर्यंतच्या सागरी मार्गाची माहिती होती. तेथून त्याने श्रीवर्धनच्या दिशेने मार्गक्रमण केले.

Mumbai Crime : आरोपीला पकडून कारवाई केल्यानंतर बोटीत श्रीवर्धन येथे पुन्हा डिझेल भरण्यात आले. दोन पोलिसांसह आरोपीला घेऊन बोट पुन्हा वसईकडे रवाना झाली. शुक्रवारी आरोपीला पुन्हा वसईत आणण्यात आले.

हे ही वाचा :

रोपांची शक्ती : सिलिकॉनची संजीवनी

Kiran Lohar : टोंगा युनिव्हर्सिटीला ठेंगा दाखवून मिळवली डॉक्टरेट!

Back to top button