Rajnath singh on POK : राजनाथ सिंह यांचे मोठे विधान; 'पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणार' | पुढारी

Rajnath singh on POK : राजनाथ सिंह यांचे मोठे विधान; 'पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणार'

पुढारी ऑनलाईन डेस्क : पाकव्याप्त काश्मीरबाबत संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी मोठे विधान केले आहे. पाकव्याप्त काश्मीरातील नागरिकांवर अत्याचार केले जात आहेत. पाकिस्तानला याचे परिणाम भोगावे लागतील, असा इशारा राजनाथ सिंह यांनी दिला आहे. गिलगिट आणि बाल्टिस्तान ताब्यात घेतल्याशिवाय जम्मू-काश्मीर आणि लडाखचा विकास होणार नाही, असही ते यावळी म्हणाले. ‘शौर्यदिना’निमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. (Rajnath singh on POK)

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात जम्मू-काश्मीर आणि लडाखचा विकास सुरू आहे. जर आपण गिलगिट आणि बाल्टिस्तानपर्यंत पोहचलो तर विकासाचे ध्येय पूर्ण होईल.  आजच्याच दिवशी १९४७ मध्ये भारतीय वायूसेनेने पहिल्यांदा लँडीग केले होते. त्यामुळे हा दिवस ‘शौर्यदिन’ म्हणून साजरा केला जातो. (Rajnath singh on POK)

दहशतवादावरून पाकिस्तानवर हल्लाबोल (Rajnath singh on POK)

पाकिस्तान सामान्य नागरिकांवर अन्याय, अत्याचार करत आहे. याचे परिणाम लवकरच समोर येतील, असा इशारा राजनाथ सिंह यांनी दिला. दहशतवादाला कोणताही धर्म नसतो. पाकिस्तानने दहशतवादाला खतपाणी घातले. पाकिस्तानने नेहमी दहशतवाद्यांचा वापर भारताविरुद्ध केला आहे, असा आरोपही त्यांनी यावेळी केला आहे. पुढे बोलताना सिंह म्हणाले, ५ ऑगस्ट २०१९ ला मोदी सरकारने कलम ३७० हटवून जम्मू-काश्मीरमधील लोकांवर होणार अन्याय थांबवला आहे. (Rajnath singh on POK)

हेही वाचलंत का?

Back to top button