Congress president Mallikarjun Kharge : 'मजुराचा मुलगा काँग्रेस अध्यक्ष झाला, माझ्यासाठी भाऊक क्षण'- मल्लिकार्जुन खर्गे | पुढारी

Congress president Mallikarjun Kharge : 'मजुराचा मुलगा काँग्रेस अध्यक्ष झाला, माझ्यासाठी भाऊक क्षण'- मल्लिकार्जुन खर्गे

पुढारी ऑनलाईन डेस्क : भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे नवनिर्वाचित अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे (Mallikarjun Kharge) बुधवारी (दि. २६) दिल्लीतील अखिल भारतीय काँग्रेस कमिटी (AICC) मुख्यालयात या पदाचा कार्यभार (Congress president) स्वीकारला. यावेळी कॉंग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी, खासदार राहुल गांधी आणि पक्षाच्या सरचिटणीस प्रियांका गांधी-वड्रा उपस्थित होते. त्याचबरोबर  सर्व काँग्रेस कार्यकारिणी सदस्य, खासदार, प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष, सीएलपी नेते, माजी मुख्यमंत्री, माजी प्रदेशाध्यक्ष आणि एआयसीसीच्या इतर पदाधिकाऱ्यांना या कार्यक्रमासाठी आमंत्रित केले आहे. वरील सर्व संबंधितांना कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते के. सी. वेणुगोपाल (K. C. Venugopal) यांनी निमंत्रण पाठवले होते. (Congress president Mallikarjun Kharge)

मल्लिकार्जुन खर्गे यांनी भारतीय काँग्रेस कमिटी (AICC) मुख्यालयात जाण्यापूर्वी राजघाटावर महात्मा गांधी यांच्या समाधी स्थळाचे दर्शन घेतले

Congress president Mallikarjun Kharge : २४ वर्षानंतर गांधी घराण्याबाहेरील अध्यक्ष 

खर्गे यांनी त्यांचे प्रतिस्पर्धी असलेले शशी थरूर (Shashi Tharoor) यांना पक्षाच्या सर्वोच्च पदाच्या शर्यतीत मोठ्या फरकाने पराभूत केले. २४ वर्षांनंतर कॉंग्रेसचे अध्यक्षपद मिळवणारे ते पहिले गांधी घराण्याबाहेरील व्यक्ती आहेत. १७ ऑक्टोबर रोजी झालेल्या मतदानात खर्गे यांना राष्ट्रपतीपदाच्या लढतीत ७,८९७ मते मिळाली तर त्यांचे विरोधक शशी थरूर यांना १,०७२ मते मिळाली. काँग्रेसच्या १३७ वर्षांच्या इतिहासात सहाव्यांदा अध्यक्षपदासाठी निवडणूक झाली आहे.

खर्गे यांचा राजकीय प्रवास थोडक्यात

गांधी घराण्‍याचे एकनिष्‍ठ आाणि विश्‍वासू सहकारी म्हणून  मल्‍लिकार्जुन खर्गे यांची ओळख आहे. जाणून घेवूया त्यांचा थोडक्यात राजकीय प्रवास जाणून घेवूया.

 

  • मल्‍लिकार्जुन खर्गे यांचा जन्‍म कर्नाटकमधील बिदर जिल्ह्यात १९४२ मध्‍ये झाला.
  • शिक्षण गुलबर्गा येथे झाले. पदवीनंतर  कायद्याची पदवी घेतली.  काही काळ वकिली व्‍यवसाय केला.
  • महाविद्‍यालयीन जीवनात त राजकीय कारकीर्दीला सुरुवात.
  • १९६९ मध्‍ये मल्‍लिकार्जुन यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला.
  • काँग्रेसमधील प्रवेशानंतर (१९६९) ३ वर्षांनी अवघ्या तीन वर्षात म्‍हणजे १९७२ मध्‍ये ते गुरमितकल मतदारसंघातून आमदार झाले.
  • गुरमितकल मतदारसंघातून आमदार झाल्यानंतर ते सलग १० वेळा आमदार होण्याचा विक्रम केला.
  • कनार्टक राज्यात त्यांनी ग्रामविकास मंत्री, गृहमंत्री महसूल मंत्री, उद्योग मंत्रीपद भूषवले. १९९४ मध्‍ये ते कनार्टक विधानसभा विरोधी पक्षनेते झाले.
  • २००५ ते २००८ या काळात कर्नाटक काँग्रेस प्रदेशाध्‍यक्षपदाची जबाबदारी सांभाळली.
  • २००९ मध्‍ये गुलबर्गा लोकसभा मतदारसंघातून लोकसभा निवडणूक लढवली.
  • २००९ मध्‍ये ते केंद्रात कामगार आणि रोजगार मंत्री झाले.
  • १७ जून २०१३ ते १६ मे २०१४ या कालावधीत त्‍यांनी केंद्रीय रेल्‍वे मंत्रीपदाची धुरा संभाळली.
  • २०१४च्‍या लोकसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाचा दारुण पराभव झाला. यावेळी लोकसभेत खर्गे यांना पक्षाने गटनेता म्‍हणून निवडले.
  • २०१९ लोकसभा निवडणकीत खर्गे यांचा पराभव झाला.
  • १६ फेब्रुवारी २०२१ रोजी त्‍यांची राज्‍यसभा विरोधी पक्षनेतेपदी निवड झाली.
    • २६ ऑक्टोबर २०२२ कॉंग्रेस अध्यक्ष झाले.

हेही वाचा

Back to top button