पंढरपूर : दिवाळीनिमित्त श्री विठ्ठल-रूक्‍मिणी मंदिरात ७०० किलो पाना, फुलांची आकर्षक आरास | पुढारी

पंढरपूर : दिवाळीनिमित्त श्री विठ्ठल-रूक्‍मिणी मंदिरात ७०० किलो पाना, फुलांची आकर्षक आरास

पंढरपूर ; पुढारी वृत्तसेवा : दिवाळीनिमित्त श्री विठ्ठल-रूक्मिणी मंदिरात व सोळखांबी व सभामंडप येथे पिवळ्या व केसरी झेंडूच्या फुलांची सुंदर आरास करण्यात आली आहे. सुमारे 700 किलो पाना फुलांचा वापर करुन मनमोहक आरास करण्यात करण्यात आली आहे. यामुळे मंदिराचे स्वरुप नयमरम्य दिसत आहे. श्री विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनासाठी आलेल्‍या भाविकांच्या डोळ्याचे पारणे फेडणारी ही आरास लक्षवेधी ठरत आहे.

 

दिवाळीचे औचित्य साधून विठ्ठल मंदिर समितीच्या वतीने श्रींच्या मंदिरात, सोळखांबी सभामंडप येथे पाना फुलांची आरास करण्यात आली आहे. श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात विविध सण, उत्सव काळात रंगीगेरंगी फुलांचा वापर करुन सजावट केली जाते. मंदिरात सजावट करण्यासाठी भाविक उत्सुक असतात. भाविकांकडून पाना, फुलांचा व डेकोरेटर्सचा खर्च करत मोफत सेवा दिली जात आहे.
श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्यावतीने सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर, कार्यकारी अधिकारी संजीव जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली व्यवस्थापक बालाजी पुदलवाड यांनी संपुर्ण मंदिरात सोळखांबी, विठ्ठल सभामंडपात आकर्षक सजावट करण्यात आली आहे.

श्री विठ्ठल-रूक्‍मिणी

 

श्री विठ्ठल व रुक्मिणी मातेचे हे सजलेले अनोखो रुप पाहण्यासाठी मोठ्या संख्येने भाविक पंढरीत श्रींच्या दर्शनासाठी गर्दी करत आहेत. श्रींच्या दर्शनाकरीता आलेल्या भाविकाना मंदिरात करण्यात आलेल्या मनमोहक आरासीचे दर्शन मिळत असल्याने भाविक मनोमनी सुखावले जात आहेत. तर मंदिर समितीच्या संकेतस्थळावरुनही घरबसल्या भाविकांना सुंदर आरासीचे दर्शन मिळत आहे.

दरम्यान, श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरातील रुक्मिणी मातेच्या चरणावरील वज्रलेपाची झिज झाली होती. यानंतर यावर वज्रलेप करण्यात आला आहे. सातत्याने होणारी झिज थांबवण्यासाठी पुरातत्व विभागाने श्रींच्या गाभार्‍यात फुलांची आरास करण्यास बंदी करावी, असे म्हटले आहे. त्यानुसार मंदिर समितीने श्रींच्या गाभार्‍यात आरास न करता मंदिर, सोळखांबी व सभामंडप येथे आरास करण्यात आली आहे.

हेही वाचा :  

Back to top button