Ayodhya Deepotsav 2022: अयोध्यानगरी आपल्या सांस्कृतिक प्रबोधनाचे प्रतिबिंब: पंतप्रधान मोदी | पुढारी

Ayodhya Deepotsav 2022: अयोध्यानगरी आपल्या सांस्कृतिक प्रबोधनाचे प्रतिबिंब: पंतप्रधान मोदी

पुढारी ऑनलाईन डेस्क: मध्ययुगीन काळापासून आधुनिक काळापर्यंत भारताला अनेक वादळ, संकटांचा सामना करावा लागला आहे. या काळात अनेक सभ्यता पूर्णपणे नष्ट झाल्या, परंतु भारत प्रत्येक अंधकारमय युगातून बाहेर आला आणि आपल्या पराक्रमाने भविष्य घडवले. अयोध्येचा हा कार्यक्रम आपल्या सांस्कृतिक प्रबोधनाचे प्रतिबिंब आहे. आज आपण भाग्यवान आहोत की आपण अयोध्येचे हे भव्य आणि दिव्य रूप पाहत आहोत, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. आज (दि.२३) अयोध्येतील सरयूच्या तीरावर भव्य दीपोत्सवाचे (Ayodhya Deepotsav 2022) उद्घाटन केल्यानंतर ते बोलत होते.

दीपोत्सवाच्या (Ayodhya Deepotsav 2022) निमित्ताने संपूर्ण अयोध्या राममय झाली आहे. आज अयोध्येत एकाच वेळी १७ लाख दिवे प्रज्वलित करून विश्वविक्रम केला आहे. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी अयोध्येत पोहोचताच त्यांनी प्रथम रामललाचे दर्शन घेतले. त्या नंतर राम मंदिराच्या बांधकामाची प्रगतीचा आढावा घेतला. रामकथा पार्क येथे आयोजित कार्यक्रमात त्यांनी जंगलातून परतलेल्या भगवान श्री रामाचा राज्याभिषेक केला. एक काळ असा होता की आपल्याच देशात श्रीरामाच्या अस्तित्वावर प्रश्न उपस्थित केले जात होते. त्याचा परिणाम असा झाला की आपल्या देशातील धार्मिक स्थळांचा विकास मागे पडला. गेल्या आठ वर्षांत धार्मिक स्थळांच्या विकासाचे काम आम्ही पुढे नेले आहे, असे पंतप्रधान मोदी यावेळी म्हणाले.

Ayodhya Deepotsav 2022 : अयोध्यानगरी लाखो दिव्यांच्या प्रकाशाने उजळली

दरम्यान, दिपावलीच्या पूर्वसंध्येला (दि.२३) अयोध्यानगरी लाखो दिव्यांच्या प्रकाशाने उजळली.  राम जन्मभूमीत लाखो दिवे प्रज्वलित करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रमुख उपस्थितीत हा दिपोत्सव साजरा करण्यात आला. या वेळी दिव्यांबरोबरच विशेष विद्युत रोषणाई सुद्धा करण्यात आली होती.  यावेळी १७ लाख दिवे प्रज्वलित करत एक नवीन जागतिक विक्रम करण्यात आला. दिव्यांच्या या लख्ख प्रकाशाने आयोध्यानगरी परिसर रोषणाईने (Ayodhya Deepotsav 2022) न्हावून निघाला आहे. यावेळी उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ उपस्थित होते.

 

गेल्यावर्षी आयोध्येतील शरयू नदी काठावर ९ लाख ५१ हजार मातीचे दिवे प्रज्वलित करण्यात आले होते. ज्याने एक वेगळा विश्वविक्रम नोंदवला होता. यंदाही पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते श्रीरामाचा राज्याभिषेक करण्यात आला. श्रीरामाची पूजा, आणि दर्शनानंतर शरयू नदी काठावर भव्य आरती झाली होती. पंतप्रधानानी रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्राची पाहणी केली त्यानंतर दीपोत्सव (Ayodhya Deepotsav 2022) सोहळ्यात ते सहभागी झाले. पंतप्रधान मोदिंच्या हस्ते दीप प्रज्वलित होताच, देशभरात २०२२ च्या दीपोत्सवाला सुरूवात झाली.

हेही वाचा:

 

Back to top button