Diwali Festival : अभ्यंग स्नानासाठी असं बनवा घरच्या घरी सुगंधी उटणं

Diwali Festival : अभ्यंग स्नानासाठी असं बनवा घरच्या घरी सुगंधी उटणं
Published on
Updated on

पुढारी ऑनलाइन डेस्क : Diwali Festival : दिवाळी हा आनंदाचा, अध्यात्माचा, गोड-धोड करून खाण्याचा सण. त्याप्रमाणेच सौंदर्य उजळवण्याचा, आपली काया अधिकाधिक सुंदर कशी होईल, याची काळजी घेणारा सण. कारण नुकताच पावसाळा संपून भाद्रपदातील कडक ऊन जाऊन गुलाबी थंडी आपल्याला साद घालत असते. थंडी सुरु होण्यापूर्वीचा हा दिवाळी सण. थंडीची चाहूल लागताच त्वचा कोरडी-शुष्क व्हायला सुरुवात होते. अशा वेळी त्वचेची काळजी कशी घ्यावी, सौंदर्य कसे खुलवावे याचा विचार आपल्या पारंपारिक Life Style मध्ये खूप खोलवर करण्यात आला आहे. त्यामुळेच दिवाळी अभ्यंग स्नान, आणि उटणं यांचं घट्ट नातं जुळलय.

Diwali Festival : अभ्यंगस्नान म्हणजे सुर्योदयापूर्वी केलेले स्नान. त्यामागे धार्मिक पौराणिक कथा अनेक आहेत. मात्र, मूळ उद्देश थंडी सुरू होत आहे. या दिवसात सूर्योदयापूर्वी स्नान केल्याने अनेक फायदे आपल्या त्वचेला आणि आरोग्याला मिळतात. अंगाला तिळाचे तेल लावून मालिश करतात. नंतर छान सुगंधी उटणं लावून आंघोळ करतात. यामुळे त्वचा मऊ कोमल राहते. कांती उजळते. मार्केटमध्ये यासाठी अनेक प्रकारची सुगंधी उटणे मिळतात. मात्र, ती महाग असतात. काही उटणे आता फक्त फ्लेवर वापरून देखील बनवली जात आहेत. काहींमध्ये भेसळ केल्याचे कानावर पडते. उटणे अगदी घरच्या घरी बनवता येते. जुन्या काळात अनेक स्त्रिया उटणे घरीच बनवत असत. जाणून घेवूया घरच्या घरी सुगंधी उटणं कसं तयार करावं याविषयी…

Diwali Festival : साहित्य-

125 ग्राम मसूर डाळीचे पीठ
15 ग्राम चंदन पावडर
10 ग्राम आवळा
10 ग्राम ज्येष्ठमध
10 ग्राम नागरमोथा
10 ग्राम मंजिष्ठादी पावडर
10 ग्राम सुंगधी कचोरा
10 ग्राम वाळा पावडर
5 ग्राम कस्तुरी
5 ग्राम गुलाबाच्या पाकळ्यांची पावडर
5 ग्राम आंबे हळद
2 ग्राम कापूर

Diwali Festival : हे सर्व साहित्य काष्ठ औषधी किंवा आयुर्वेदिक दुकानात सहज उपलब्ध होतात. सर्व साहित्य दिलेल्या प्रमाणात आणून त्याला छान मिक्स करून घ्या. झालं उटणं तयार. घरगुती तयार केलेले हे उटणे अगदी भेसळ मुक्त असेल. हे उटणे दुधात मिक्स करून सर्वांगाला लावा. नंतर 15 मिनिटांनी आंघोळ करून घ्या. दिवाळीपासून अभ्यंगस्नान सुरू करा. संपूर्ण थंडीत अशा प्रकारे अभ्यंगस्नान केल्यास त्वचा मुलायम, नाजूक आणि कोमल राहील.

हेही वाचा :

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news