Ukadiche Modak : उकडीचे स्वादिष्ट मोदक कसे कराल?  | पुढारी

Ukadiche Modak : उकडीचे स्वादिष्ट मोदक कसे कराल? 

पुढारी ऑनलाईन डेस्क : “गणपत्ती बाप्पा मोरया…”, या जयघोषात आपला लाडका बाप्पा अवघ्या काही तासांतच घरात प्रवेश करणार आहे. घरातील पुरुष मंडळींनी बाप्पाच्या स्वागताची जंगी तयारी सुरू केलीय, तर किचनमध्ये गृहिणींनी बाप्पाच्या आवडत्या रेसिपीची अर्थात उकडीच्या मोदकाची (Ukadiche Modak) तयारीदेखील सुरू केलेली आहे. आज आपण ‘उकडीचे मोदी कसे करायचे’, हे सविस्तर पाहू…

उकड काढण्यासाठी लागणारे साहित्य : २ ग्लास पाणी, चवीनुसार मीठ, तूप आणि तेल, अर्धा किलो आंबेमोहर तांदूळ.

सारणाचे साहित्य : एक नारळ, सुका मेवा, वेलची पावडर, खवा आवडत असेल तर खवा, पावशेर गूळ.

सारण तयार करण्याची कृती :  १) नारळाचे तुकडे पडणार नाही, याची दक्षता घेऊन नारळ सोलून घ्या. त्यानंतर गूळदेखील बारीक चिरून घ्या.

२) आता चिरलेला खूळ आणि खिसलेला नारळ हे दोन्हीदी मंद गॅसवर भाजून घ्या. त्यानंतर त्याचं सारण तयार करून घ्या. हे करत असताना त्यामध्ये वेलची पावडर घाला.

३) जर तुम्हाला काजू, बदाम आणि बेदाणे आवडत असतील तर, सारण तयार करताना तेही घालू शकता. आणि हो… तुम्हा खवा आवडत असेल तर खवादेखील घालू शकता.

Ukadiche Modak

उकळ काढण्याची कृती : १) आंबमोहर तांदूळ धुवा आणि सुकत घाला. त्यानंतर सुकलेल्या आंबेमोहर तांदळाचे पीठ दळूण घ्या.

२) गॅसवर दोन ग्लास पाणी उकळत ठेवा. त्यानंतर तेवढ्याच प्रमाणात तांदळाचे पीठ घेऊन उकळत्या पाण्यात टाका. ते पीठ असणारे पाणी ढवळून घ्या. ढवळत असताना त्यामध्ये तूप टाकून घ्या.

३) नंतर भांड्यावर झाकण ठेवून वाफ काढून घ्या. नंतर एक परात घेऊन त्यामध्ये ढवळून घेतलेले पीठ काढून घ्या. ते पीठ हाताला तेल लावून मळून घ्या.

४) पीठ मळून झाल्यानंतर हाताला तेल लावून मोदकाची पारी तयार करा. (लक्षात घ्या… पीठ गरम असतानाचा मळून घ्या म्हणजे मोदक चांगले होतात)

५) पारी तयार करून झाली तर, त्यामध्ये सारण भरून घ्या. त्यानंतर मोदकाच्या व्यवस्थित पाळ्या तयार करून घ्या.

६) गॅसवर पाणी उकळत ठेवा. त्यानंतर मोदकपात्रात हे मोदक ठेवून २० मिनिटं वाफलून घ्या. वाफललेले मोदक एका प्लेटमध्ये काढून घ्या. या गरम गरम मोदकावर तुम्ही तूप घालू शकता.

अशाप्रकारे आपल्या आवडत्या बाप्पाचा आवडता पदार्थ म्हणजेच उकडीचे मोदक (Ukadiche Modak) तयार झाले. बाप्पाला मोदकाचा नैवेद्य आणि तु्म्हीही सर्वांसोबत उकडीच्या मोदकाचा आनंद घ्या.

उकडीच्या मोदकाची रेसिपी व्हिडीओतून पहा

Back to top button