Andheri East bypoll : अंधेरी पोटनिवडणुकीत माघार घेतल्याबद्दल राज ठाकरेंनी भाजपचे मानले आभार  | पुढारी

Andheri East bypoll : अंधेरी पोटनिवडणुकीत माघार घेतल्याबद्दल राज ठाकरेंनी भाजपचे मानले आभार 

पुढारी ऑनलाईन डेस्क : काल मी केलेल्या विनंतीला मान देऊन आपण अंधेरी (पूर्व) च्या पोट-निवडणुकीत (Andheri East bypoll) भारतीय जनता पक्षाचा उमेदवार उभा न करण्याचा निर्णय घेतला. याबद्दल आपले, आपल्या सहकाऱ्यांचे आणि पक्षातील वरिष्ठ नेतेमंडळींचे शतश: आभार…असे लिहित मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी  उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानले आहे.

Andheri East bypoll
Andheri East bypoll

Andheri East bypoll : अंधेरी पूर्व विधानसभा पाेटनिवडणूक

अंधेरी पोटनिवडणुकीबाबत दररोज नवनवीन ट्विस्ट पाहायला मिळाले आहेत. सुरुवातीला ऋतुजा लटके विरुद्ध मुंबई महापालिका, असे राजीनामा नाट्य रंगले. ते संपल्यानंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून ऋतुजा लटके विरुद्ध भाजप आणि शिंदे गटाचा उमेदवार मुरजी पटेल यांच्यात मुख्य लढत रंगणार असे चित्र निर्माण झाले होते. मात्र, ऋतुजा या दिवंगत आमदार यांच्या पत्नी आहेत. त्यामुळे भाजप आणि शिवसेना बाळासाहेबांची शिंदे गटाने निवडणूक लढवू नये, असे आवाहन राज ठाकरे यांनी केले. त्यामुळे या निवडणुकीत एक नवा ट्विस्ट निर्माण झाला. त्यापाठोपाठ शरद पवार यांनीही राजकीय पक्षांनी निवडणूक टाळण्याचे आवाहन केले. सोबतच ऋतुजा यांना आपला पाठिंबा जाहीर केला. यानंतर भाजप आणि शिवसेना बाळासाहेबांची शिंदे गटाकडून उमेदवार मुरजी पटेल यांनी ‘वेट अँड वॉचचा’ सल्ला दिला गेला.

अंधेरी पूर्व विधानसभा पाेटनिवडणुकीतून  ( Andheri Bypoll )  भाजपचे उमेदवार मुरजी पटेल यांनी माघार घेतील अशी घोषणा  भाजपचे प्रदेशाध्‍यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज नागपूरमध्‍ये केली. यामुळे आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या उमेदवार ऋतुजा लटके यांचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यानंतर राज ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहित आभार मानले आहे. पत्र आहे तसं,

प्रिय मित्र देवेंद्रजी, सस्नेह जय महाराष्ट्र !

काल मी केलेल्या विनंतीला मान देऊन आपण अंधेरी (पूर्व) च्या पोट-निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचा उमेदवार उभा न करण्याचा निर्णय घेतला याबद्दल आपले, आपल्या सहकाऱ्यांचे आणि पक्षातील वरिष्ठ नेतेमंडळींचे शतश: आभार.

चांगली, सकारात्मक राजकीय संस्कृती ही सुदृढ समाजासाठी आवश्यक असते. अशी राजकीय संस्कृती असावी, वाढावी आणि राजकीय मंचावर आपापले मुद्दे घेऊन राजकीय पक्षांनी निकोप स्पर्धा करावी, असा प्रयत्न महाराष्ट्र नवनिर्माण सेना म्हणून आम्ही कायम करत असतो. त्याला आज तुम्ही प्रतिसाद दिलात याबद्दल तुम्हा सर्वांचे पुनःश्च आभार.

आपला मित्र, राज ठाकरे

हेही वाचलंत का? 

Back to top button