Education in Hindi : इंग्रजीचे गुलाम का व्हायचे? आम्ही शिक्षण पूर्णपणे इंग्रजी मुक्त करू – मुख्यमंत्री एसएस चौहान | पुढारी

Education in Hindi : इंग्रजीचे गुलाम का व्हायचे? आम्ही शिक्षण पूर्णपणे इंग्रजी मुक्त करू - मुख्यमंत्री एसएस चौहान

पुढारी ऑनलाइन डेस्क : Education in Hindi : आम्ही शिक्षण पूर्णपणे इंग्रजीतून मुक्त करू. ज्याला (इंग्रजीत) शिक्षण घ्यायचे आहे तो अभ्यास करू शकतो, कोणतीही सक्ती नाही. आम्ही या वर्षी 6 इंजिनिअरिंग आणि 6 पॉलिटेकनिक कॉलेजमध्ये हिंदीतून शिक्षण सुरू करू. राज्यातील आयआयटी आणि आयआयएममध्ये हिंदीचे शिक्षण सुरू करण्याचे आमचे स्वप्न आहे, असे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी उपस्थित केला.

Education in Hindi : मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान आणि राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री विश्वास कैलाश सारंग यांच्या उपस्थितीत गृहमंत्री अमित शहा यांनी भोपाळमध्ये एमबीबीएस अभ्यासक्रमाच्या पुस्तकांच्या देशातील पहिल्या हिंदी आवृत्तीचे लाँच केले.

Education in Hindi : इंग्रजी भाषेचे गुलाम का व्हायचे? जर चिनी, जपानी, जर्मन, रशियन, फ्रेंच आपापल्या भाषेत शिकू शकतात आणि त्यांची प्रतिभा व्यक्त करू शकतात आणि उच्च पदांवर पोहोचू शकतात तर आमची मुले ते का करू शकत नाहीत? असा प्रश्न मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी उपस्थित केला.

Education in Hindi : आज गृहमंत्री अमित शाह इंग्रजी माध्यमाच्या शाळेत शिकत नसलेल्या आणि इंग्रजीचे ज्ञान नसल्यामुळे त्यांची प्रतिभा व्यक्त न करू शकलेल्या विद्यार्थ्यांसाठी वैद्यकीय शिक्षणाच्या पुस्तकांची हिंदी आवृत्ती लाँच करण्यात आले. आजचा दिवस इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहिला जाईल, अशी माहिती मुख्यमंत्री चौहान यांनी दिली.

Education in Hindi : आम्ही तयार केलेली (हिंदी वैद्यकीय शिक्षणाची) पुस्तके इतर राज्यांसह सामायिक करू. याबाबत मी सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना भेटणार आहे. आमच्याकडे जे काही आहे ते आम्ही इतरांना देऊ आणि त्यांनी (इतर राज्यांनी) काही चांगले केले तर आम्ही त्यांच्याकडून घेऊ, असा निर्धार मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी व्यक्त केला.

हे ही वाचा :

मोठी बातमी: भाजपच्या संसदीय मंडळातुन नितीन गडकरी, शिवराजसिंह चौहान बाहेर, येडियुरप्पा यांची एन्ट्री

Amit Shah In Assam : तेव्हा आसामच्या मुख्यमंत्र्यांनी मला बेदम मारहाण केली होती; अमित शहांनी सांगितला चार दशकांपूर्वीचा किस्सा

Back to top button