5 जी सेवा देण्यासाठी तीन महिन्यांत मोबाईलमध्ये अपडेट द्या, केंद्राचे निर्देश | पुढारी

5 जी सेवा देण्यासाठी तीन महिन्यांत मोबाईलमध्ये अपडेट द्या, केंद्राचे निर्देश

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : देशात 5 जी दूरसंचार सेवा सुरु झाली आहे. अनेक कंपन्यांच्या मोबाईलमध्ये अद्याप ही सुविधा प्राप्त करण्यासाठी आवश्यक ते अपडेट करण्यात आलेले नाहीत. या पार्श्वभूमीवर पुढील तीन महिन्यांत हे अपडेट केले जावेत, असे निर्देश केंद्र सरकारने मोबाईल कंपन्यांना दिले आहेत.

5 जी सेवेचा विस्तार करण्याच्या दृष्टीने विलंब होत असल्याची केंद्र सरकारची तक्रार आहे. दूरसंचार विभागाच्या अधिकाऱ्यांनी यासंदर्भातील आपली नाराजी स्मार्टफोन उत्पादक कंपन्यांच्या प्रतिनिधींसोबत एका बैठकीदरम्यान व्यक्त केल्याचे समजते. तीन महिन्यांच्या आत स्मार्टफोन उत्पादक कंपन्यांनी 5 जी च्या अनुषंगाने संचामध्ये अपडेट केले नाहीत, तर त्यांना कारवाईला सामोरे जावे लागू शकते, असा इशाराही देण्यात आला आहे.

एकीकडे सरकारकडून 5 जी सेवा देण्यासाठी युध्दपातळीवर प्रयत्न केले जात असताना दुसरीकडे स्मार्टफोन उत्पादक कंपन्या 5 जी मोबाईलची विक्री करण्याच्या कामात गुंतल्या होत्या. 5 जी स्मार्टफोनमध्ये अपडेट देण्याकडे त्यांचे लक्ष नव्हते, असे दूरसंचार विभागाचे म्हणणे आहे.

हेही वाचा

Back to top button