Womens Asia Cup T20 : पाकिस्तानचा भारतावर 13 धावांनी विजय! | पुढारी

Womens Asia Cup T20 : पाकिस्तानचा भारतावर 13 धावांनी विजय!

पुढारी ऑनलाईन डेस्क : आशिया चषक स्पर्धेत पाकिस्तानने भारताला १३ धावांनी पराभूत केले. सध्या सुरू असलेल्या आशिया चषक स्पर्धेतील हा भारतीय संघाचा पहिला पराभव आहे. यापूर्वी भारताने त्यांचे शेवटचे तीन सामने जिंकले होते. प्रथम फलंदाजी करताना पाकिस्तानने २० षटकांत ६ बाद १३७ धावा केल्या. प्रत्युत्तरात भारतीय संघ १९.४ षटकांत १२४ धावांत ऑलआऊट झाला. आशिया चषकाच्या इतिहासात पाकिस्तानविरुद्ध भारतीय महिला संघाचा हा पहिलाच टी-२० सामन्यातील पराभव आहे. त्याचबरोबर टी-२० क्रिकेटमधला हा तिसरा पराभव आहे. याआधी दोन्ही पराभव टी-२० विश्वचषक स्पर्धेत झाले होते. २०१२ मध्ये श्रीलंकेतील गाले आणि २०१६ मध्ये दिल्ली येथे पराभव झाला होता. दोन्ही सामन्यात मिताली राज कर्णधार होती. अशाप्रकारे, हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ पहिल्यांदाच पाकिस्तानकडून टी-२० सामना हरला.

138 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारताची सुरुवात खराब झाली. अवघ्या 23 धावांवर भारताची पहिली विकेट पडली. संधूने मेघनाला अमीनकरवी झेलबाद केले. त्यानंतर जेमिमाच्या रुपात भारताला दुसरा धक्का बसला. जेमिमाने केवळ 2 धावा केल्या. तिला निदा दारने बाद केले. मानधनाच्या रूपाने भारताला तिसरा धक्का बसला. तिला 17 धावांच्या वैयक्तिक धावसंख्येवर संधूने बाद केले. त्यानंतर चौथा झटका पूजाच्या रुपात बसला. ती धावबाद झाली. तर त्यानंटर दयालेन 20 धावा करून बाद झाली. तिला तुबा हसनने क्लीन बोल्ड केले. भारताची ही पाचवी विकेट होती.

राधा यादव पॅव्हेलियनमध्ये परतली

राधा यादवच्या रूपाने भारताला आठवा धक्का बसला. षटकार मारण्याच्या प्रयत्नात ती 18व्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर बाद झाली. तिला चार चेंडूत केवळ तीन धावा करता आल्या. संधूच्या चेंडूवर आलिया रियाझने तिचा झेल घेतला. रिचा घोषने या षटकात दोन षटकार मारत सामना रोमांचक केला.

हरमनप्रीत कौर बाद

भारताला 17व्या षटकात मोठा धक्का बसला. कर्णधार हरमनप्रीत कौर 12 चेंडूत 12 धावा करून बाद झाली. निदा दारच्या चेंडूवर आलिया रियाझने तिचा झेल घेतला. ती बाद झाल्यानंतर राधा यादव क्रीझवर आली.

भारताला मोठा धक्का

16व्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर भारताला मोठा धक्का बसला. दीप्ती शर्माला बाद करून सादियाने टीम इंडियाला सहावा धक्का दिला. दीप्तीने 11 चेंडूत 16 धावा केल्या. तिने आपल्या खेळीत तीन चौकार मारले. दीप्तीचा झेल कर्णधार बिस्माह मारूफने टिपला. ती बाद झाल्यानंतर रिचा घोष क्रीझवर आली. भारताने 16 षटकांत 6 बाद 91 धावा केल्या.

भारताच्या पाच विकेट

भारताला 12व्या आणि 13व्या षटकात दोन धक्के बसले. संधूने पूजा वस्त्राकर आणि हसनने हेमलताला पॅव्हेलियनमध्ये पाठवले. पूजाला पाच आणि हेमलता 20 धावा करू शकल्या. 13 षटकांनंतर भारताची धावसंख्या पाच गड्यांच्या मोबदल्यात 70 धावा होती.

भारताला तिसरा धक्का

भारतीय संघाला 10व्या षटकात तिसरा धक्का बसला. स्मृती मानधना 19 चेंडूत 17 धावा करून बाद झाली. संधूने तिची विकेट घेतली. तर इमान अन्वरने स्मृतीचा झेल पकडला. 10 षटकांनंतर भारताची धावसंख्या तीन गड्यांच्या मोबदल्यात 50 धावा होती.

भारताला दुसरा धक्का

उत्कृष्ट फॉर्मात असलेली जेमिमा रॉड्रिग्ज या सामन्यात विशेष काही करू शकली नाही. सहाव्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर ती बाद झाली. जेमिमाला निदा दारने बाद केले. तिने आठ चेंडूत दोन धावा केल्या. जेमिमा बाद झाल्यानंतर दयालन हेमलता क्रीजवर आली. यावेळी भारताची धावसंख्या सहा षटकांत दोन बाद 30 होती.

भारताला पहिला धक्का

चौथ्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर भारताला पहिला धक्का बसला. नशरा संधूने मेघनाला बाद केले. मेघना वेगाने धावा काढत होती. तिने 14 चेंडूत 15 धावा केल्या. यादरम्यान तिने एक चौकार आणि एक षटकार मारला. संधूच्या चेंडूवर तिने अमीनकडे झेल दिला. ती बाद झाल्यानंतर जेमिमा रॉड्रिग्ज क्रीजवर आली.

भारताची वेगवान सुरुवात

सब्बिनेनी मेघना आणि स्मृती मानधना यांनी भारताकडून डावाची सुरुवात केली. दोन्ही खेळाडूंनी संघाला आक्रमक सुरुवात करून दिली. भारताने तीन षटकात बिनबाद 23 धावा केल्या. मेघना 12 चेंडूत 15 तर मंधना सहा चेंडूत 6 धावा करून नाबाद होती.

भारतासमोर विजयासाठी 138 धावांचे लक्ष्य

पाकिस्तानने भारतासमोर विजयासाठी 138 धावांचे लक्ष्य ठेवले आहे. पाकने 20 षटकात 6 गडी बाद 137 धावा केल्या. पाकिस्तानकडून निदा दारने नाबाद 56 धावा केल्या. तिने 37 चेंडूंच्या खेळीत पाच चौकार आणि एक षटकार मारला. निदाशिवाय कर्णधार बिस्माह मारूफने 32 धावांचे योगदान दिले. भारताकडून दीप्ती शर्माने तीन, पूजा वस्त्राकरला दोन विकेट घेतल्या. तर रेणुका सिंग एक विकेट घेण्यात यशस्वी ठरली.

आजच्या सामन्यांमध्ये भारताच्या प्लेईंग इलेव्हनमध्ये स्नेह राणाच्या ठिकाणी राधा यादव खेळणार असून पाकिस्ताननेही त्यांच्या प्लेईंग इलेव्हनमध्ये काही बदल केले आहेत.

भारतीय महिला संघ प्लेईंग इलेव्हन : हरमनप्रीत कौर (कर्णधार), रिचा घोष (विकेट किपर), स्मृती मानधना, जेमिहा रॉड्रिग्स, सभीनेणी मेघना, पूजा वस्त्रकार, दीप्ती शर्मा, राजेश्वरी गायकवाड, रेणुका सिंग, डायलान हेमलता आणि राधा यादव.

हे वाचलंत का?

 

 

Back to top button