दुर्गम भागातील एसटी सेवा पूर्ववत करा : आ. शिवेंद्रराजे भोसले | पुढारी

दुर्गम भागातील एसटी सेवा पूर्ववत करा : आ. शिवेंद्रराजे भोसले

परळी; पुढारी वृत्तसेवा : एसटीची सुविधा जर पूर्ववत सुरू झाली नाहीतर आम्ही काय करायचे ते करू, अशा शब्दांमध्‍ये  आ.शिवेंद्रराजे भोसले यांनी सातारा एसटी व्यवस्थापकांना धारेवर धरले. सातारा तालुक्यातील परळी, केळवली, वावदरे आणि ठोसेघर भागातील अतिदुर्गम अशा खेडोपाडी लालपरी अर्थात एसटीची सुविधा कोरोना पूर्वकाळात सुरळीत सुरू होती; परंतू लॉकडाऊननंतर ती पूर्ववत सुरु झालेली नाही. त्यामुळे ज्‍येष्‍ठ नागरिक, रुग्ण, विद्यार्थी आणि कामगारांची माेठी गैरसोय होत  आहे.

 आम्ही काय करायचे ते करू – आ.शिवेंद्रराजे भोसले

आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी खेडोपाड्यातील लोकांची होणारी गैरसोय लक्षात घेता सातारा एसटी महामंडळातील आधिकाऱ्यांना विचारणा केली. “एसटीची सुविधा जर पूर्ववत सुरू झाली नाहीतर आम्ही काय करायचे ते करू”, असा इशाराहीदिला. यावेळी आम्ही एसटीची सुविधा ताबडतोब पूर्वरत करू, एसटी व्यवस्थापकांनी दिली.

हेही वाचा :

Back to top button