शेअर बाजारात Black Friday; ४ लाख कोटींचा चुराडा

शेअर बाजारात Black Friday; ४ लाख कोटींचा चुराडा

पुढारी ऑनलाईन – अमेरिकेची मध्यवर्ती बँक फेडरल रिझर्व्हने व्याज दर ७५ बेसिक पॉईंटने वाढवल्यामुळे आणि चीनमध्ये मंदीच्या शक्यतेने भारतीय शेअर बाजार आज कोसळला. इंट्राडेमध्ये शुक्रवारी निफ्टी आणि संसेक्स हे दोन्ही निर्देशांक १.५ टक्क्यांनी खाली, त्यामुळे गुंतवणुकदारांची जवळपास ४ लाख कोटी रुपयांचे नुकसान झाले. (Sensex Nifty fall for third straight session)

विशेष म्हणजे निफ्टी बँक निर्देशांकाची कामगिरी सर्वांत खराब राहिली. गुंतवणूकदारांची पसंती असलेला एचडीएफसी बँक हा शेअर जवळपास २.८९ टक्केंनी खाली आला होता.

फेडरल रिझर्व्हने महागाई विरोधात कडक धोरण अवलंबले असल्याने २०२३च्या दुसऱ्या तिमाहीत अमेरिका मंदित जाईल, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. फेडरल रिझर्व्ह नोव्हेंबर, डिसेंबर आणि फेब्रुवारी २०२३मध्ये पुन्हा व्याजदर वाढवण्याची शक्यता आहे.
शुक्रवारी सलग तिसऱ्या दिवशी भारतीय शेअर बाजारावर याचे परिणाम पाहायला मिळाले. गुंतवणुकदारांचे आता लक्ष भारतीय रिझर्व्ह बँकेच्या पतधोरणाकडे असणार आहे. भारतीय बँकांची तरलता गेल्या १४ महिन्यात प्रथमच नकारात्मक झालेली आहे.

हेही वाचा

Exit mobile version