Railway News : लाॅजिस्टिक खर्चातील कपातीसाठी रेल्वेची पायाभूत सुविधा प्रकल्पांना चालना | पुढारी

Railway News : लाॅजिस्टिक खर्चातील कपातीसाठी रेल्वेची पायाभूत सुविधा प्रकल्पांना चालना

नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा : लॉजिस्टिक विभागाचा खर्च कमीत कमी करण्याच्या अनुषंगाने भारतीय रेल्वेने (Railway News) अलीकडच्या काळात रेल्वे रुळांशी संबंधित रेल्वे पायाभूत सुविधा प्रकल्पांना चालना दिली आहे. रेल्वेरुळ प्रकल्पांना लवकरात लवकर पूर्ण करण्यास रेल्वेने त्यामुळे प्राधान्यक्रम दिला आहे. गतवर्षीच्या तुलनेत एप्रिल-सप्टेंबर या कालावधीत रेल्वे रुळ प्रकल्पांची प्रगती, गेज रुपांतरण आणि मल्टी-ट्रॅंकिंगमध्ये जवळपास तीन पटीने अधिक वाढ झाल्याचा दावा रेल्वे मंत्रालयाने केला आहे.

चालू आर्थिक वर्षात २१ सप्टेंबर २०२२ पर्यंत रेल्वेने १ हजार ३५३ ट्रॅक किलोमीटर (टीकेएम) लांबीचे नवीन लाईन्स, गेज रुपांतरण आणि मल्टी ट्रॅकिंग प्रकल्प पूर्ण केले आहे. महिन्या अखेरपर्यंत आणखी १५० टीकेएम जोडले जाण्याची शक्यता आहे. गेल्या आर्थिक वर्षांतील याच काळातील टीकेएमच्या तुलनेत यंदाचा आकडा हा तिप्पट आहे. ३० सप्टेंबर २०२१ पर्यंत ४८२ टीकेएम पूर्ण करण्यात आले होते. विशेष म्हणजे नवीन लाईन, दुहेरीकरण, गेज रुपांतरण यामध्ये २०२१-२२ मध्ये २ हजार ४०० किलोमीटरचे लक्ष ओलांडत २ हजार ९०४ किलोमीटरचे लक्ष गाठण्यात आले.

Back to top button