IND vs AUS 2nd T20 : ऑस्ट्रेलियाविरूद्धचा दुसरा टी-२० सामना जसप्रीत बुमराह खेळणार? रोहित शर्माने दिले संकेत | पुढारी

IND vs AUS 2nd T20 : ऑस्ट्रेलियाविरूद्धचा दुसरा टी-२० सामना जसप्रीत बुमराह खेळणार? रोहित शर्माने दिले संकेत

पुढारी ऑनलाईन डेस्क : भारत आणि ऑस्ट्रेलिया दरम्यान खेळवण्यात आलेल्या पहिल्या टी-२० सामन्यात भारतीय गोलंदाजांची कामगिरी सुमार राहिली. ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांनी भारताचे २०० पेक्षा जास्त धावांचे आव्हान सहज काबीज केले. उद्या (दि.२३) भारत वि. ऑस्ट्रेलिया मालिकेतील दुसरा टी-२० सामना नागपूर मध्ये खेळवला जाणार आहे. पहिल्या टी-२० सामन्यात भारताचा प्रमुख गोलंदाज जसप्रीत बुमराहला पाठीच्या दुखापतीमुळे खेळता आला नाही. (IND vs AUS 2nd T20)

दरम्यान, भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माने जसप्रीत बुमराह टी-२० मालिकेतील उर्वरित दोन सामने खेळताना दिसणार असल्याचे म्हटले आहे. जसप्रीत बुमराहने इंग्लंडविरूद्धच्या मालिकेत अंतिम सामना खेळला होता. यानंतर पाठीच्या दुखापतीमुळे त्याला आशिया चषक स्पर्धेला मुकावे लागले होते. ऑस्ट्रेलियाविरूद्धचा पहिला टी-२० सामनाही जसप्रीत बुमराह दुखापतीच्या कारणामुळे खेळू शकला नव्हता. बुमराहच्या गैरहजेरीत भारतीय संघाच्या गोलंदाजी अतिशय खराब होताना दिसत आहे. यानंतर भारतीय संघ जसप्रीत बुमराह बाबत कोणता निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष्य आहे. (IND vs AUS 2nd T20)

भारतीय संघ : 

रोहित शर्मा (कर्णधार), के.एल. राहुल (उपकर्णधार), विराट कोहली, सूर्यकुमार यादव, दीपक हुड्डा, ऋषभ पंत, दिनेश कार्तिक, हार्दिक पंड्या, रवीचंद्रन अश्विन, युजवेंद्र चहल, अक्षर पटेल, भुवनेश्वर कुमार, हर्षल पटेल, दीपक चाहर, जसप्रीत बुमराह, उमेश यादव (IND vs AUS 2nd T20)

ऑस्ट्रेलिया संघ :

अॅरॉन फिंच (कर्णधार), कॅमेरॉन ग्रीन, स्टीव्ह स्मिथ, ग्लेन मॅक्सवेल, जोश इंग्लिस, टिम डेव्हिड, मॅथ्यू वेड, पॅट कमिन्स, नॅथन एलिस, अॅडम झाम्पा, जोश हेझलवूड, सीन एबॉट, एश्टन एगर, कैमरन ग्रीन

हेही वाचलंत का?

Back to top button