जागतिक कौशल्य परिषदेचे दिल्लीत आयोजन | पुढारी

जागतिक कौशल्य परिषदेचे दिल्लीत आयोजन

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : पंधराव्या जागतिक कौशल्य परिषदेचे आयोजन 27 आणि 28 सप्टेंबर रोजी नवी दिल्ली येथे करण्यात आले आहे, अशी माहिती फिक्की संघटनेकडून गुरुवारी देण्यात आली. कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर मागील दोन वर्षे ही परिषद घेण्यात आली नव्हती. एज्युकेशन टू एम्प्लॉईबिलिटी- मेकिंग इट हॅपन हा विषय केंद्रीभूत ठेवून यावेळच्या कौशल्य परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे.

केंद्रीय कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या हस्ते जागतिक कौशल्य परिषदेचे उद्घाटन केले जाईल. परिषदेत ज्या मान्यवरांचे मार्गदर्शन होणार आहे, त्यात कौशल्य विकास खात्याचे सचिव अतुलकुमार तिवारी, नीती आयोगाचे कौशल्य विकास विभाागचे सल्लागार कुंदन कुमार, एनईव्हीईटीचे अध्यक्ष निर्मलजीतसिंग कलसी, राष्ट्रीय कौशल्य विकास महामंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी वेदमणी तिवारी, एआयसीटीईचे माजी अध्यक्ष व एनईटीएफचे अध्यक्ष अनिल सहस्त्रबुध्दे यांचा समावेश आहे.

याशिवाय जागतिक बँक, जागतिक कामगार संघटना, युएनडीपी, युनिसेफ, जीआयझेड, युएन विमेन्स आदी जागतिक पातळीवरील संघटनांचे प्रतिनिधी मार्गदर्शन करणार आहेत. ज्या कंपन्यांचे परिषदेत सामील होतील, त्यात लिंक्डइन, अडोबे, महिंद्रा अँड महिंद्रा, शिंडलर इलेक्ट्रिक, हिंदुस्थान युनिलिव्हर, सेल्सफोर्स, स्कीलवेरी मेटासर्व, एक्सआर सिम्युलेशन्स, अ‍ॅमॅझॉन, गो डिस्कव्हर, हूडअ‍ॅप आदींचा समावेश आहे.

हेही वाचा : 

Back to top button