Teenagers: किशोरवयीन मुले कशाबद्दल सतर्क असतात ? जाणून घ्‍या, नव्‍या सर्वेक्षणातील माहिती | पुढारी

Teenagers: किशोरवयीन मुले कशाबद्दल सतर्क असतात ? जाणून घ्‍या, नव्‍या सर्वेक्षणातील माहिती

पुढारी ऑनलाईन डेस्‍क: एका हॉस्पिटलने केलेल्या सर्वेक्षणानुसार, ६४ टक्के पालकांचे असे मत आहे की, त्यांची मुले हे वजन, उंची, त्वचा आणि दिसणे याबद्दल अधिक जागृक असतात. राष्ट्रीय स्तरावर करण्यात आलेल्या या सर्वेक्षणात १६ हजारांहून अधिक आई-वडिलांनी सहभाग घेतला होता. ज्यामध्ये त्यांच्या ८ ते १८ वयोगटातील मुलांचा समावेश होता. या सर्वेक्षणात भाग घेतलेल्या पालकांनी सांगितले आहे की, त्यांनी या भावनांचे प्रमाण  किशोरवयीन (Teenagers) मुलांमध्ये सर्वाधिक पाहायला मिळाले. यामधील सहभागी ७३ टक्के मुलींपैकी ५७ टक्क्यांमध्ये तर, ६९ टक्के मुलांपैकी ४९ टक्क्यांमध्ये पालकांना या भावना पाहायला मिळाल्या.

दिसण्‍यावरुन मुलांच्‍या मनात नकारात्‍मक परिणाम

सर्वेक्षणात २७ टक्के पालकांनी असे सांगितले की,  मुलांमध्‍ये दिसण्यावरून तयार झालेल्या भावनेचा नकारात्मक परिणाम (Teenagers) होतो. तसेच यामधील २० टक्के पालकांनी असे सांगितले की, त्यांचे मुल दिसणावरून तयार झालेल्या भावनेच्या कारणाने कोणत्याही ॲक्टिव्हिटीमध्ये भाग घेत नाही. यामधील १८ टक्के पालकांनी असे देखील सांगितले की, फोटोमध्ये येण्यास विरोध दर्शवला. १७ टक्के पालकांनी असे सांगितले की आमच्या मुलांनी स्वत:ची उपस्थिती लपविण्याचा प्रयत्न केला. तर ८ टक्के मुलं ही कुठेही लक्ष न देता, खाण्यात व्यस्त असलेली दिसली.

मुलांच्‍या  शरीराबद्दल सकारात्मक भावना निर्माण करणे गरजेचे

यावर अनेक सहभागी पालकांनी असेही सांगितले आहे की, मुलाची बऱ्याचवेळा इतर मुलांशी तुलना केली जाते, अनोळखी व्यक्ती, कुटूंबातील सदस्य, शिक्षक, त्याला आरोग्यसेवा देणाऱ्याकडून वाईट वागणूक दिली जाते. यापैकी दोन तृतीयांश पालकांना असेही वाटते की, त्यांच्या मुलाला कसे वागवले गेले पाहिजे याची त्यांना जाणीव आहे. या अभ्यासावरून तज्ज्ञांनी असे निष्कर्ष काढले आहेत की, शरीराची नकारात्मक छाप ही मुलांच्या आत्मजागृकतेवर प्रभाव टाकून भावनिक जडणघडणेवर परिणाम करू शकते. त्यामुळे किशोरवयीन मुला मुलींना त्यांच्या शरीराबद्दल सकारात्मक भावना निर्माण करणे हे अधिक महत्त्वाचे आहे.

मुलांच्यात का निर्माण होतात अशा भावना?

या संशोधनात सहभागी असलेल्या तज्ज्ञ आणि अभ्यासकांनी असे म्हटले आहे की, बहुतेक किशोरवयीन मुलांना त्यांच्या आयुष्यातील काही संदर्भांमध्ये अस्वस्थ किंवा आत्म-जागरूक वाटते. मुलांच्या विकासाच्या महत्त्वाच्या टप्प्यांवर इतरांच्या तुलनेत त्यांचे शरीर हे विविध परिस्थितीत कल्पना आणि तुलना करण्यास परवानगी देते. त्यामुळे सभोवती असणारी परिस्थिती, समाज आणि संस्कृती याबद्दल त्यांच्या मनात आत्मजागृकता निर्माण होते. त्यांच्या मनावर असा काही ईमेज निर्माण होतात की त्यामुळे भावनिक गुंता वाढतो.

पालकांनो किशोरावस्थेतील मुलांना करा अशी मदत

  • किशोरावस्थेतील मुलांना आणि किशोरवयीन मुलींना त्यांच्या जीवनातील या कठीण भावनिक समस्येतून बाहेर काढण्यासाठी पालकच महत्त्वाची भूमिका निभावू शकतात.
  • पालकांनी त्यांच्या पाल्याची दिसण्यावरून नाही तर त्याच्यातील चांगल्या गुणांवरून प्रशंसा करावी.
  • तुमच्या पाल्याची इतर मुला-मुलींशी तुलना करणे टाळा.
  • पालकांनी पाल्यामध्ये निर्माण होणाऱ्या भावनांबद्दल आपल्या पाल्याशी मनमोकळेपणाने बोलावे.
  • पालकांना स्वत: आणि मुलांनाही सोशल मीडियापासून दूर ठेवावे. तसेच पालकांनी त्यांच्या मुलांचे फोटो त्यांच्या परवानगी शिवाय सोशल मीडियावर पोस्ट करू नयेत.
  • पालकांनी मुलांसाठी कुटूंबात खेळीमेळीचे आणि आश्वासक वातावरण निर्माण करावे.

 

 

Back to top button