तृणमूलचे खासदार सरकार यांनी पंतप्रधानांचा मॉर्फ फोटो केला ट्विट, भाजपच्‍या प्रत्‍युत्तरानंतर ट्विट केले डिलीट | पुढारी

तृणमूलचे खासदार सरकार यांनी पंतप्रधानांचा मॉर्फ फोटो केला ट्विट, भाजपच्‍या प्रत्‍युत्तरानंतर ट्विट केले डिलीट

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : मध्य प्रदेशातील कुनो नॅशनल पार्कमध्ये शनिवारी (दि.17) नामिबियातून आणलेले आठ चित्ते साेडण्‍यात आले. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फोटोग्राफी केली. यावर तृणमूल काँग्रेसचे खासदार जवाहर सरकार यांनी  पंतप्रधानांची खिल्ली उडविण्‍यासाठी मॉर्फ (एडीट) फोटो शेअर केला. यानंतर पश्चिम बंगालचे भाजप अध्यक्ष सुकांत मजुमदार यांनी ट्विट करत मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर निशाणा साधला. यानंतर जवाहर सरकार यांनी त्यांचे मॉर्फ  फोटो असणारे  ट्विट डिलीट केले.

जवाहर सरकार पंतप्रधान मोदींचा बनावट फोटो शेअर केला आहे. यामध्ये कॅमेऱ्याची लेन्स कव्हरने झाकलेला फोटो आहे. आणि पंतप्रधान कॅमेरासोबत फोटो काढताना दिसत आहेत. यानंतर पश्चिम बंगालचे भाजप अध्यक्ष सुकांत मजुमदार यांनी ट्विट करत मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर निशाणा साधला. ते म्‍हणाले, ‘टीएमसीचे राज्यसभा खासदार कॅमे-याच्या लेन्स कव्हरसह फोटो काढत आहेत. असे खोटे प्रकार करण्याचा प्रयत्न करत आहेत.  ममता बॅनर्जी आपण कमीत कमी अक्कल असणार्‍या व्यक्तीला नोकरी द्या.ं

सुकांत मजुमदार यांच्या ट्विटनंतर टीएमसीचे राज्यसभा खासदार जवाहर सरकार यांनी त्यांचे ट्विट डिलीट केले. मात्र, जवाहर सरकार यांनी असे कृत्य करण्याची ही पहिलीच वेळ नाही. याआधीही त्यांनी पंतप्रधान मोदींचा एक फोटो बनावट फाेटाे शेअर केला होता.

 

हेही वाचा

 

Back to top button